न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात भारतीय संघाला पराभवाने करावी लागली. पहिल्या वनडेत भारतीय संघाने 306 धावा करूनही न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. भारतीय संघाच्या पहिल्या पराभवावर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन याने निशाणा साधला आहे. त्याने कर्णधार शिखर धवन, प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
खरं तर, भारतीय संघ पहिल्या सामन्यात फक्त 5 गोलंदाजी पर्यायांसोबत मैदानावर उतरला होता. यामध्ये अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. मात्र, या गोलंदाजाना यजमान संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि टॉम लॅथम (Tom Latham) यांची भागीदारी मोडण्यात यश आले नाही. भारतीय संघाने या सामन्यासाठी वापरलेली रणनीती उपयोगी पडली नाही.
सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने विलियम्सन आणि लॅथम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सोबत म्हटले की, भारतीय संघाने गोलंदाजीत चुका केल्या. त्याने ट्वीट केले की, “न्यूझीलडं संघाने शानदार खेळ दाखवला. 300 धावांचा स्कोरही 270 प्रमाणे वाटत होता. विलियम्सनने नेहमीप्रमाणेच शानदार खेळ दाखवला. मात्र, लॅथमने कमालीची फलंदाजी केली आणि सर्व श्रेय घेतले. एक सलामीवीर म्हणून खालच्या फळीत येणे आणि तरीही यशस्वी होणे सोपे नाहीये. फक्त 5 गोलंदाजांना खेळवून भारताने चूक केली.”
Well played @BLACKCAPS 👏🏽 Made 300 look like 270. Williamson all class as always but Latham stole the show. Not easy for an opener to move down the order and still be successful. India missed a trick by just playing 5 bowlers. #NZvIND pic.twitter.com/bcGnf6K5Ry
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 25, 2022
यावर मायकल वॉन याने त्याला प्रत्युत्तर देत म्हटले की, भारतीय संघाला जुन्या काळातील संघ म्हटले. त्याने लिहिले की, “हा एक जुनाट विचाराचा संघ आहे. तुमच्याकडे संघात सात नसतील, तर कमीत कमी सहा गोलंदाज पर्याय असले पाहिजेत.”
They are a dated ODI team .. you need at least 6 if not 7 bowling options .. https://t.co/UXsgWb2PvN
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 25, 2022
खरं तर, भारताकडे राखीव खेळाडूंमध्ये गोलंदाजी पर्याय आहेत. त्यात दीपक हुड्डा, दीपक चाहर, कुलदीप यादव यांना पहिल्या वनडेत घेतले नव्हते. यामध्ये हुड्डा आणि चाहर खालच्या फळीत फलंदाजी आणि गोलंदाजीही करू शकतात. दुसऱ्या वनडेत या दोघांना संधी दिली गेली होती. मात्र, पावसामुळे त्यांना गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही गोष्टी करता आल्या नाहीत. (michael vaughan dig at shikhar dhawan and vvs laxman read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ 2 कारणांमुळे संजू सॅमसन सारखाच होतोय टीम इंडियातून बाहेर? वसीम जाफरचा संघ व्यवस्थापनावर निशाणा
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल