इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू आहे. ओव्हलच्या मैदानावर सुरू असलेला हा सामना सध्या रोमहर्षक स्थितीत चालू आहे. हा सामना आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाने ४६६ धावा केल्यानंतर इंग्लंड समोर ३६८ धावांचे आव्हान ठेवले आहे.
ज्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. ज्यामध्ये चौथ्या दिवसाअंती इंग्लंडची स्थिती बिनबाद ७७ धावा अशी होती. ज्यानंतर आता या सामन्याचा शेवटचा आणि ५ वा दिवस सुरू झाला आहे. यादरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने आर अश्विनशी संबंधित एक ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेचा विषय बनला आहे.
वॉनच्या मते या सामन्यात इंग्लंडचा संघ हरला असता. मात्र, भारतीय संघात अश्विन नसल्यामुळे आता इंग्लंडकडे जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. याबाबत बोलताना वॉन म्हणाला, “काय शानदार कसोटी सामना आहे. दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. जर अश्विन हा सामना खेळत असता, तर इंग्लंडला हा सामना जिंकणे कठीण गेले असते. अश्विनच्या अनुपस्थितीत इंग्लंडकडे जिंकण्याची एक चांगली संधी आहे. आतापर्यंतची ही कसोटी मालिका काय अप्रतिम राहिली आहे.”
What a Test match .. Genuine chance for both teams to win .. If Ashwin was playing England would have no chance .. Without they certainly have a chance .. What a GREAT test series this has been .. !! #ENGvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) September 5, 2021
इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत झालेल्या ४ कसोटी सामन्यात भारतीय संघाने अश्विनला खेळण्याची संधी दिली नाही. त्या ऐवजी भारतीय संघाने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला फिरकीपटू म्हणून संघात स्थान दिले होते, व त्याच्यासोबत ४ वेगवान गोलंदाजांचा समावेश केला होता. त्यामुळे अश्विनची आता खूप आठवण काढली जात आहे.
चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. तेव्हा भारतीय संघाने ४६६ धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान मिळाले. यानंतर भारतीय संघ गोलंदाजीसाठी उतरला. तेव्हा भारतीय चाहत्यांनी अश्विनची खूप आठवण काढली. चौथ्या डावात अश्विनचा एक चांगलाच विक्रम राहिलेला आहे.
अशात अनेक चाहते आणि क्रिकेट तज्ञांच्या मते अश्विन या सामन्यात खेळत असता, तर इंग्लंडसाठी त्याने खूप अडचण निर्माण केली असती असे मत व्यक्त केले. तसेच त्याऐवजी संघात संधी मिळालेल्या जडेजाने आतापर्यंत १३ षटकात २८ धावा दिल्या आहेत. यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.
दरम्यान, ५ व्या दिवसातील पहिल्या सत्रात ४८ षटकानंतर इंग्लंडची स्थिती ११२ वर १ विकेट अशी होती. ज्यामध्ये सलामीवीर रोरी बर्न्स ५० धावा करून शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर बाद झाला. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी अजूनही २५६ धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘भारत आर्मी’चा इंग्लडमध्ये जल्लोष, विराटसाठी खास डान्स, व्हिडिओ व्हायरल
–वाढदिवस विशेष: भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी करणारा फलंदाज, मुलीच्या मृत्यूनंतर लागला होता धार्मिक प्रवचन द्यायला
–कर्णधार कोहलीची रहाणेला संघाबाहेर करण्याची तयारी! ‘हे’ निर्णय देत आहेत संकेत