---Advertisement---

“ऑस्ट्रेलियाचा संघ घाबरून खेळतोय”, इंग्लंडच्या दिग्गजाची ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर जहरी टीका

---Advertisement---

ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 1-2 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघ 103.1 षटकात 295 धावा करून सर्वबाद झाला. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील पाहुण्या संघाने या सामन्यात 12 धावांनी आघाडी घेतलेली. मात्र, त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

यापूर्वीच ऍशेस नावावर केलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काहीसा संथ खेळ दाखवला. दिवस संपताना त्यांनी 12 धावांची छोटीशी आघाडी घेतली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक आक्रमक खेळ दाखवू शकला असता असे वॉन म्हणाला,

“मला वाटते की ऑस्ट्रेलियाने अधिक बचावात्मक खेळ दाखवला. ते आता ऍशेस घरी घेऊन जात असले तरी इतके घाबरून खेळताना त्यांना मी कधीही पाहिले नव्हते. ते खास करून आक्रमक खेळ खेळण्यावर भर देतात. याच खेळाच्या जोरावर सामना देखील पुढे नेतात. मला वाटते की ते गोलंदाजांवर दबाव बनवण्यास विसरले आहेत. ऑस्ट्रेलियाची ही मी पाहिलेली सर्वात खराब फलंदाजी आहे. ते असे कधीच खेळले नव्हते.”

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने बचावात्मक खेळावर भर दिलेला. मार्नस लॅब्युशेनने 8 धावा करण्यासाठी 70 पेक्षा अधिक चेंडू खेळले. तर, त्यानंतर इतर फलंदाजही अशीच फलंदाजी करताना दिसून आले. प्रमुख फलंदाज बाद झालेले असताना, कर्णधार कमिन्सने 86 चेंडूत 36 धावा केल्या, तर टॉड मर्फीने 39 चेंडूत 34 धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना त्यांना बारा धावांची आघाडी मिळाली.

(Michael Vaughan Slams Australia Slow Batting In Oval Test)

महत्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट ब्रॉडचा भीमपराक्रम! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला-वहिला गोलंदाज
स्मिथच्या रनआऊट वादावर ब्रॉडचा मोठा खुलासा, ‘कुमार धर्मसेना म्हणाले होते…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---