---Advertisement---

मायकल वॉनच्या मते धोनीनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो सीएसकेचा कर्णधार

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 7:32 PM
dhoni csk
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांच्या मते महेंद्रसिंग धोनी जास्त दिवस खेळणार नसून त्याच्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधार पद सांभाळण्यासाठी योग्य उमेदवार शोधायला हवा आहे. तसेच त्यांनी या पदासाठी नाव देखील सुचवले आहे. वॉन यांच्या मते कर्णधारपदासाठी रविंद्र जडेजा हा उत्तम खेळाडू आहे. कारण तो फलंदाजी चांगल्या प्रकारे करतो तसेच गोलंदाजीही चांगली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यात देखील माहिर आहे. शिवाय त्यामध्ये त्याची मानसिकता खूप चांगली असल्यामुळे धोनीनंतर तो सीएसकेचा कर्णधार होऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे.

वॉनने क्रिकबझला सांगितले की, “तुम्ही म्हणत असाल धोनी आणखी 2-3 वर्षे खेळेल आणि मला पण वाटते तो जास्त दिवस खेळणार नाही त्यामुळे संघव्यवस्थापनाने पुढे कोणत्या खेळाडूला कर्णधार करता येईल यावरती आताच विचार करावा. यामध्ये रविंद्र जडेजा हा एक चांगला पर्याय आहे कारण तो उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि उत्तम असा क्षेत्ररक्षक देखील आहे.”

पुढे बोलताना त्यांनी, “जडेजा फलंदाजी करताना कोणत्याही क्रमांकावर करू शकतो. त्याला तुम्ही वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवू शकता तसेच सलामी फलंदाजीसाठी सुद्धा उतरवू शकता किंवा चार पाच नंबरवरही उतरवू शकता. तसेच विरोधी संघाकडे पाहून तुम्ही गोलंदाजीची सुरूवात सुद्धा त्याच्यापासून करू शकता आणि क्षेत्ररक्षणालाही त्याला महत्त्वाच्या ठिकाणी ठेवू शकता”, असे म्हटले आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सीएसकेच्या विजयात जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सामन्यात त्याने जोस बटलर आणि शिवम दुबे यांचे बळी घेत काही महत्त्वाचे झेलदेखील घेतले होते. 2012 च्या आयपीएलपासून तो सीएसके संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तो सध्या धोनीनंतर सीएसकेचा कर्णधार होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

फुटबॉल जगतात आले वादळ, या बड्या युरोपियन संघानी उभारली बंडखोर लीग

विराटचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न पडणार लांबणीवर? वाचा काय आहे प्रकरण

DC vs MI Live : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये केले हे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---