---Advertisement---

चेन्नई संघासाठी यंदा ‘हे’ खेळाडू ठरू शकतात ट्रम्पकार्ड, संघाच्या प्रशिक्षकानेच केला खुलासा

On: रविवार, एप्रिल 4, 2021 9:22 PM
---Advertisement---

गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये पार पडली होती. यंदाचे हंगाम भारतातच पार पडणार आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने देखील कसून सरावाला सुरुवात केली आहे. स्पर्धा सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असताना चेन्नई संघाचा फलंदाजी प्रशिक्षक माईकल हसी याने मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. पहिल्यांदा चेन्नई संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. त्यामुळे येणाऱ्या हंगामात चेन्नई संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. याच पार्श्वभूमीवर सीएसके संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी खेळाडू माईकल हसी याने आगामी हंगामात सीएसके संघासाठी कोणता युवा खेळाडू महत्वाची भूमिका बजावू शकतो, याबाबत आपले मत मांडले आहे.

माईकल हसी याने आगामी हंगामासाठी संघ नियोजनाबाबत बोलताना म्हटले की, “यावेळेस चेन्नई संघ खूप संतुलित संघ दिसून येत आहे. तसेच प्रत्येक विभागात खोली आहे. मोईन अली एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच रॉबिन उथप्पाने देखील गेल्या काही काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला, “तसेच कृष्णप्पा गौतमकडे प्रतिभा आहे. ज्याच्याबरोबर चेन्नई संघ व्यावस्थापन येत्या काळात चांगल्या योजना तयार करू शकेल.”

कृष्णप्पा गौतम याला आयपीएल २०२१ साठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात सीएसके संघाने ९.२५ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले आहे. या हंगामात गौतम चांगली कामगिरी करेल अशी आशा संघाकडून व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

टेबल टेनिसमध्येही पुजाराच्या डिफेन्सने फोडला दीपक चहरला घाम, पाहा व्हिडिओ

आठ वर्षांपूर्वी विराटच्या विकेटसह बुमराहने घेतली होती आयपीएलमध्ये रॉयल एन्ट्री; आता म्हणतोय…

नक्की असं घडलं काय की मार्नस लॅब्युशेनने घेतलेल्या त्या झेलावर झाला मोठा वाद, घ्या जाणून 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---