---Advertisement---

‘इंग्लंडला गुंडाळलं, आता भारताचा नंबर,’ न्यूझीलंडच्या दणदणीत विजयानंतर दिग्गजाचा दावा

On: सोमवार, जून 14, 2021 8:52 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने जोरदार पुनरागमन करत, इंग्लंड संघावर ८ विकेट्सने विजय मिळवला. ही मालिका १-० ने आपल्या नावावर करत न्यूझीलंड संघाने २२ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने इंग्लंड संघावर संताप व्यक्त केला आहे. तसेच भारतीय संघाबद्दलही मोठे वक्तव्य केले आहे.

या विजयासह न्यूझीलंड संघाने आयसीसीच्या कसोटी संघाच्या यादीत (१२३ रेटिंग पॉइंट्स) पहिले स्थान गाठले आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी (१२१ रेटिंग पॉइंट्स) भारतीय संघ आहे. इंग्लंड संघाच्या पराभवानंतर माजी इंग्लिश कर्णधार माईकल वॉन यांनी इंग्लंड संघाला खडेबोल सुनावले आहे.

वॉनने ट्विट करत लिहिले की, “न्यूझीलंड एक उच्च दर्जाचा संघ आहे. ज्यांनी परिस्थिती अनुकूल फलंदाजी केली. गोलंदाजी देखील उत्कृष्ट केली. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणदेखील जबरदस्त होते. मी अशी कल्पना करत आहे की, आता पुढच्या आठवड्यात ते अंतिम सामन्यात भारतीय संघालाही पराभूत करतील.”

न्यूझीलंड संघ विजयाचा प्रबळ दावेदार
यापूर्वी वॉनने न्यूझीलंड संघाला विजयाचे प्रबळ दावेदार म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, “भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघ माझ्यासाठी विजयाचा प्रबळ दावेदार आहे. त्यांनी दोन अटीतटीचे सामने खेळले आहेत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. भारतीय संघाने देखील इंट्रास्क्वाड सराव सामने खेळले. परंतु त्यामध्ये इतकी स्पर्धा नव्हती.”

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जूनदरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साउथम्पटन स्टेडियमवर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ना २ किमी धावण्याची मेहनत, ना डच्चूची चिंता; श्रीलंकेला जाणाऱ्या खेळाडूंसाठी ‘खुशखबर’!

‘त्याच्यावर धोनीने विश्वास दाखवला नाही, मग श्रीलंका दौऱ्यावर कसे काय निवडले?’ दिग्गजाचा मोठा प्रश्न

कसोटी मालिकेपुर्वी दिग्गजाची इंग्लंडला चेतावणी; म्हणाले, ‘रोहित सहज २-३ शतके ठोकणार’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---