---Advertisement---

मोठी बातमी! मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोना विरुद्ध लढताना निधन; भारतीय महिला व्हॉलिबॉल संघाचे केले होते नेतृत्व

On: रविवार, जून 13, 2021 11:12 PM
---Advertisement---

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग सध्या कोविड-१९ विरुद्ध लढा देत आहेत. मात्र, मिल्खा सिंग यांच्या कुटुंबासाठी आणखी एक दु:खद बातमी रविवारी आली आहे. त्यांची पत्नी निर्मल कौर यांचे कोविड-१९ विरुद्ध लढताना रविवारी निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी तीन आठवडे कोविड विरुद्ध लढल्यानंतर मोहालीमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. निर्मल कौर या भारतीय महिला व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार राहिल्या आहेत.

निर्मल यांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यानंतर ९१ वर्षीय मिल्खा सिंग यांनाही त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या आरोग्यात सुधारना होत असल्याचे, त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

रविवारी मिल्खा सिंग यांच्या कुटुंबाकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की ‘आम्हाला कळवण्यात दु:ख होत आहे की निर्मला मिल्खा सिंग यांचे आज दुपारी ४ वाजता निधन झाले. पंजाब सरकारमधील स्पोर्ट्स फॉर वुमनचे माजी संचालक आणि भारतीय महिला व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मलजी यांनी अगदी शेवटपर्यंत लढा दिला. मिल्खा कुटुंबाच्या त्या कणा होत्या. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मिल्खा सिंग उपस्थित राहु शकत नाही. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत. सर्वांनी दिलेल्या प्रार्थनेसाठी आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.’

मिल्खा सिंग आणि निर्मल यांची प्रेमकहाणी १९६० च्या दशकात सुरु झाली होती. निर्मल यांचा पाकिस्तानमधील शेखूपुरा येथे ८ ऑक्टोबर १९३८ रोजी जन्म झाला होता. त्यांनी तीन वेगवेगळ्या वेळी पंजाब व्हॉलिबॉल संघाचे नेतृत्व केले होते. त्या १९५५ साली भारतीय व्हॉलिबॉल संघासह श्रीलंकेला गेल्या होत्या. तिथेच त्यांनी मिल्खा सिंग यांच्याशी भेट झाली. पण त्यांची मैत्री १९६० आणि १९६१ मध्ये दोघांना चंदीगडमध्ये क्रीडा प्रशासक म्हणून नेमण्यात आले, तेव्हा वाढली. त्यानंतर १९६२ साली त्यांनी लग्न केले.

निर्मल यांनी राजशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले आहे. चंदीगढ येथे क्रीडा सुविधा निर्माण करण्यात निर्मय यांचा मोठा वाटा होता. त्यांनी १९९० च्या दशकात निवृत्ती स्विकारली.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसी स्पर्धांबाबत बीसीसीआयने बदलली ‘ही’ भूमिका, मात्र आता आयपीएल आयोजन येणार अडचणीत

“न्यूझीलंडला अंतिम सामन्यात मिळेल ‘हा’ मोठा फायदा”, चेतेश्वर पुजाराने दिली कबुली

WTC Final पूर्वी दिग्गजाचे मोठे भाष्य, ‘इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकत न्यूझीलंडने क्षमता दाखवून दिली’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---