सोमवारी (24 एप्रिल) आयपीएलमध्ये गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असलेले सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ भिडले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी केवळ 144 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघ सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिल्लीच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. त्याचवेळी प्रथमच आयपीएलमध्ये खेळत असलेल्या हॅरी ब्रुक याचे अपयश पुन्हा एकदा कायम राखले.
हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विजयासाठी मिळालेल्या 145 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला ब्रुक व मयंक अगरवाल यांनी 31 धावांची सलामी दिली. दोन सामन्यांपूर्वी शतक ठोकलेला ब्रुक पुन्हा एकदा अपयशी ठरला. 14 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा करून तो बाद झाला.
ब्रुक इंग्लंडच्या राष्ट्रीय संघासाठी खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना दिसतो. मात्र, टी20 क्रिकेटमध्ये त्याला फारसे यश मिळालेले नाही. त्याने खेळलेल्या मागील 14 पैकी 13 सामन्यात त्याला केवळ एकदाच 20 धावांची वेस ओलांडत आली आहे. केकेआरविरुद्ध त्याने शतक साजरे केले होते. त्यानंतर व त्याच्या आधी देखील त्याला संघासाठी फारसे योगदान देता आले नव्हते.
प्रथमच आयपीएलमध्ये खेळत असलेल्या ब्रुकवर सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटींची मोठी बोली लावली होती. त्याला आयपीएल 2023 मध्ये पहिल्या तीन सामन्यात केवळ 29 धावा करता आलेल्या. त्यानंतर त्याने शतक साजरे केले. मात्र, पुन्हा एकदा 9,18 व 7 अशा धावा तो करू शकला. हैदराबादला आगामी काळात यशस्वी व्हायचे असल्यास ब्रुकला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून दाखवावा लागेल.
(Millions Dollar Baby Harry Brook Flop Show Continue In IPL 2023 For Sunrisers Hyderabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी
SRHvDC| नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी, वॉर्नर 4 वर्षानंतर खेळणार हैदराबादमध्ये