आयपीएल 2021 मधील तिसरा सामना रविवार (11 एप्रिल) रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता संघाने हैदराबाद संघावर 10 धावांनी विजय मिळवला. तत्पुर्वी या सामन्यात कोलकाता संघाची फलंदाजी चालू असताना हैदराबादचा गोलंदाज राशिद खानने सामन्यातील पहिला बळी मिळवून कोलकाता संघाला प्रारंभिक झटका दिला. त्यानंतर त्याच्या चेंडूवर संघ सहकारी मनिष पांडेने भन्नाट झेल टिपला.
‘मिस्ट्री गर्ल ऑफ सनरायझर्स हैदराबाद’ म्हणून ओळखली जाणारी काव्या मरन ही या सामन्यात तिच्या हैदराबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचली होती. यावेळी, ती हैदराबादच्या केशरी कलरच्या जर्सीमध्ये दिसली. या सामन्याचे थेट प्रक्षेपण होत असताना ती बर्याचदा टीव्ही पडद्यावरही दिसली. विशेष म्हणजे, राशिद खानने विकेट घेताच तिची रिऍक्शन पाहण्याजोगी राहिली होती.
सुरुवातीला 6.6 षटकात हैदराबादकडून खेळत असलेल्या राशिद खानने कोलकाता संघाचा सलामी फलंदाज शुभमन गिलला त्रिफळाचीत केले. तेव्हा स्टेडियमच्या गॅलरीमध्ये काव्या मरन जोरदार आनंद साजरा करताना दिसली.
त्यानंतर 16.2 षटकात राशिद खानच्या चेंडूवर मनिष पांडेने अप्रतिम डाइव्ह मारत बाउंड्री लाईनजवळ भन्नाट झेल टिपला आणि कोलकाताचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेलला तंबूत धाडले. यावेळीही तिने दिलेली रिऍक्शन लक्षवेधी ठरली.
मारन का दिल आया पांडे जी पर, कैच के कारन ❣️❣️ what a catch Manish babu#IPL2021 #ManishPandey #KolkataKnightRiders #sunrisehydrabad pic.twitter.com/vyxHWYMxBe
— [email protected] (@pakas2009) April 11, 2021
कोण आहे ही काव्या मरन?
या आयपीएल सामन्यात दिसलेली रहस्यमयीन मुलगी काव्या मरन ही हैदराबाद संघाचे मालक कलानिधि मरन यांची मुलगी आहे. याबरोबरच ती हैदराबाद संघाची सीईओसुद्धा आहे. आयपीएल 2021 च्या लिलावामध्येही ती सनरायझर्स हैदराबादच्या फ्रंचायझी टेबलवरती दिसली होती. मॅच ऑफिशियल्सला सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याची मुभा देण्यात आल्याने ती कोलकाता-हैदराबाद सामन्याचा आनंद लुटताना दिसली.
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमकडून विराट कोहलीने ‘ही’ गोष्ट शिकावी, माजी पाकिस्तानी खेळाडूचे मोठे भाष्य