ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू होण्याआधी त्यांच्या संघाला सल्ला दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची ही मालिका गुरुवारी (9 फेब्रुवारी) सुरू होईल. उभय संघांतील पहिला कसोटी सामना नागरूपच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाईल.
मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी 73 कसोटी, 153 वनडे आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने तब्ब्ल 313 विकेट्स घेतल्या, जी कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी सोपी गोष्ट म्हणता येणार नाही. जॉन्सनच्या मते पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभी केली, तर यजमान भारतीय संघावर दबाव वाढेल. ऑस्ट्रेलियन संघासाठी जॉन्सनचा हा सल्ला पहिल्या कसोटी सामन्यात कारगर ठरू शकतो.
मिचेल जॉन्सनकडून ऑस्ट्रेलिया संघाला खास सल्ला
द वेस्ट ऑस्ट्रेलियासाठी लिहिलेल्या कॉलममध्ये जॉन्सन म्हणाला की, “भारतीय खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. याठिकाणी जर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांदा फलंदाजी करू शकला तर भारतावर दबाव बनेल. ऑस्ट्रेलियन संघ चार फिरकी गोलंदाजांना घेऊन गेला आहे. भारतीय फलंदाज नाथन लिऑन (Nathan Lyon) याचा अनुभव आणि कसोटी आकडेवारी पाहून त्याचा सन्मान करतील. संघातील इतर फिरकी गोलंदाजांपासून त्यांनी अधिक भीती नसेल. कारण भारतीय फलंदाज पावलांचा चांगल्या पद्धतीने वापर करतात आणि फिरकी गोलंदाजीला चांगल्या पद्धतीने खेळतात.”
“ऑस्ट्रेलिया संघ 2008 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये खेळणार आहे. तेव्हा या सामन्यात जेसन क्रेजा याने 12 विकेट्स घेतल्या होत्या. सुरुवातीला ही खेळपट्टी खूप सपाट असेल आणि यावर जराही गवत नसेल. याठिकाणी गोलंदाजांना चेंडू स्विंग करता येणार नाही. वेगवान गोलंदाजांना याठिकाणी खेळताना अधिक अडचणी येतील. नाथन लिऑनला मात्र याठिकाणी गोलंदाजी करताना मजा येऊ शकते,” असे जॉन्सन पुढे म्हणाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या कसोटी सामन्यांपूर्वी जोरदार सराव केला आहे. अलूरमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने ट्रनिंग कॅम्प लावला असून भारताविरुद्ध खेळण्यासाठी ते पूर्णपणे तयार दिसत आहे. भारतीय संघाची ताकत पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ चांगल्या प्रकारे जाणतो. असात कसोटी मालिका जिंकण्यासाठी त्यांच्याकडून संपूर्ण ताकत लावली जाईल. (Mitchell Johnson gives special advice to the Australian team to win against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला रिषभच्या कानशिलात मारायची आहे”, माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान
सचिननंतर कोहलीच! फक्त 64 धावा करताच विराट होणार ‘एलिट क्लब’मध्ये सामील