ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेश जॉन्सन, याने विराट कोहली याच्या सुधारत्या फॉर्मविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मचा सामना करत होता. पण आशिया चषक 2022 मध्ये त्याला स्वतःचा जुना फॉर्म परतल्याचे दिसले. विराटने आशिया चषकात तब्बल 1020 दिवसांच्या काळानंतर शतक देखील ठोकले. मिचेल जॉन्सच्या मेत भारतीय संघासाठी ही चांगली गोष्ट आहे की, विराट पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन करू लागला आहे.
भारताला मंगळवार म्हणजेच 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. भारताला ही मालिका मायदेशात खेळायची असल्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी आव्हान नक्कीच सोपे नसेल. त्यातच भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फळंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला पुन्हा एखदा चांगला फॉर्म गवसला आहे. विराटने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 122 धावा केल्या. चाहत्यांना त्याच्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा जवळपास तीन वर्षांपासून होती, जी त्याने या सामन्यात पूर्ण केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत देखील विराटकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना आहे. उभय संघांतील ही मालिका सुरू होण्यापूर्वी मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) म्हणाला की, “ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे की, आता त्यांचे सर्वश्रेष्ठ खेळाडू धावा करत आहेत आणि संघाला खात्रीही मिळत आहे. विराट कोहली असा खेळाडू आहे, ज्याने कर्णधारपद सांभाळल्यानंतर संघाचे लक्ष बदलले. त्याने जर धावा केल्या, तर संघालाही आनंद होईल.”
ऑस्ट्रेलिया संघाविषयी बोलताना जॉन्सन म्हणाला की, “त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये मालिका जिंकण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे संगाला विश्वचषकासाठी आत्मविश्वास मिळेल. त्यांच्याकडे एक मजबूत संघ आहे. ही एक उप्रतिम मालिका ठरेल.” टी-20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने मोहालीमध्ये सरावाला सुरुवा देखील केली आहे, ज्याठिकाणी पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘ब्लू जर्सी’त पुनरागमन करण्यासाठी उमेश यादव तयार, 43 महिन्यांनंतर खेळणार टी-20 मालिका
शमीच दुर्दैव पुन्हा आलं आड; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पत्ता कट
भारतीय हॉकी क्षेत्रात भूकंप! कर्णधार मनप्रीतवर लावले गेले गंभीर आरोप; वाचा सविस्तर प्रकरण