कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता संपूर्ण जगभरात वाढताना पहायला मिळत आहे. आतापर्यंत १० हजारपेक्षा अधिक लोकांना या व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर २.४५ लाख लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. संपूर्ण जगभरातून या व्हायरसला नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅकलेनघननेही (Mitchell Mcclenaghan) लोकांना या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अनोख्या अंदाजात संदेश दिला आहे.
मिचेल पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) खेळून आपल्या देशात परतला आहे. यावेळी त्याने स्वत:ला आयसोलेटेड (Isolated) करून घेण्याचा निर्णय घेतला होता. सध्या तो आपल्या घरात एकटाच आहे. त्याने आपल्या बायकोला तिच्या वडिलांच्या घरी पाठवले आहे. कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) सुरक्षित राहण्यासाठी मिचेलने स्वत:लाच आयसोलेटेड करून घेतले आहे.
यादरम्यान त्याने सोशल मीडियावर (Social Media) एका वेगळ्या अंदाजात लोकांना कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्याचा संदेश दिला आहे. यावेळी त्याने दोन रोगांपासून एकसोबत संरक्षण करण्याचा संदेश दिला आहे.
यावेळी तो म्हणाला की, “आपल्या घराला एका कंडोमप्रमाणे आणि कोरोना व्हायरसला एका धोकादायक एसटीडीप्रमाणे (आजाराप्रमाणे) समजा. सध्याच्या काळात आपण स्वत:पासून स्वत:चे रक्षण केले पाहिजे. ”
Think of your House as a Condom and Covid19 as a deadly incurable STD.
Protect yourself before your wreck yourself. #isolate #Covid_19 #coronavirus #useprotection
— Mitchell McClenaghan (@Mitch_Savage) March 20, 2020
जेव्हा मिचेलने स्वत:ला आयसोलेटेड (घरात राहणे) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने आपल्या वडिलांच्या घरी जाण्यापूर्वी मिचेलसाठी एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिने आपल्या पतीसाठी लिहिले होते की, “जेव्हा तू घरी पोहोचशील त्यावेळी जास्त गोंधळून जाशील. खरं तर हे खूप वाईटही असू शकते. परंतु एक आहे की तू तुझ्या पत्नीसोबत घरात बंद नसशील. तुला खूप प्रेम.”
ही चिठ्ठी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्टही केली होती. ज्यामुळे स्पष्ट होते की, या दोघांमध्ये किती जास्त प्रेम आहे.
मिचेल आतापर्यंत पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्स या संघाकडून खेळत होता. त्याने या संघाकडून आपला शेवटचा सामना ६ मार्चला खेळला होता. शनिवारी (२१ मार्च) त्याने आपल्या देशात परतण्याचा निर्णय घेतला होता.
या लीगमध्ये मिचेलला चांगली कामगिरी करता आली नाही. आशा आहे की मिचेल कोरोना व्हायरसपासून दूर राहील. मिचेल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताला फायद्याची व इतरांना महागात पडलेली आयसीसीची चुक या विश्वचषकात होणार नाही
-या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
-कोरोनापासून वाचण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूची श्रीराम चरणी धाव