---Advertisement---

काल सुंदर, आज मिचेल सँटनर; पुण्याचा मैदानावर किवी गोलंदाजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी

mitchell Santner
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्या दरम्यानचा दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी केवळ 156 धावांवर संपवून 103 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. या सामन्यात संघात सामील केलेल्या अष्टपैलू मिचेल सॅंटनर याने सात बळी मिळवत आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करण्यासोबतच त्याने पुण्याच्या मैदानावरील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आकडेवारी देखील आपल्या नावे केली.

पुणे कसोटीच्या पहिल्या डावात भारताचे फलंदाज पुरते अपयशी ठरले. मिचेल सॅंटनर याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना केवळ 53 धावांमध्ये सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. तसेच, पुण्याच्या मैदानावर कोणत्याही देशाच्या क्रिकेटपटूने केलेली ही सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली.

त्याच्या आधी या मैदानावर सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या दिवशीच नोंदवला होता. त्याने सात फलंदाजांना बाद करताना 59 धावा दिल्या होत्या. त्या आधी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह ओ’किफ याने 2017 मध्ये भारताविरुद्ध दोन्ही डावात प्रत्येकी 35 धावा देऊन 6 बळी मिळवले होते.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच दोन डाव संपल्याने आता ही कसोटी पाच दिवस चालण्याची शक्यता कमी आहे. न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात फलंदाजी करताना रचिन रविंद्र व डेवॉन कॉनवे यांच्या अर्धशतकामुळे 259 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर आता भारताचा डाव 156 धावांवर संपवत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत आणखी एक सामना खेळला जाणार आहे. मात्र, भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाल्यास, ते घरच्या मैदानावर बारा वर्षानंतर कसोटी मालिका हरतील.

महत्त्वाच्या बातम्या-

“कारकिर्दीतील सर्वात खराब शॉट”, फुलटॉसवर बाद झालेल्या कोहलीचे भारतीय दिग्गजाने टोचले कान
IND vs NZ; केवळ एकाच धावेवर बाद कोहली! भारतात फिरकीपटूंविरूद्ध खूपच खराब रेकाॅर्ड
मोठी बातमी! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हटवली वॉर्नरवरील आजीवन कर्णधारपदाची बंदी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---