विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना अवघ्या काही दिवसांवर आहे. सर्वच क्रिकेट चाहते हा मोठा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा सामना १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. तसेच हा सामना झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. भारतीय पुरुष संघासह महिला संघाला देखील जून महिन्यात इंग्लंड महिला संघाविरुद्ध कसोटी, टी -२० आणि वनडे मालिका खेळायची आहे.
बीसीसीआयने दिलेल्या आदेशानुसार सर्व खेळाडू आधी मुंबईत एकत्र येणार आहेत. त्यानंतर विलगिकरणात राहून इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे खेळाडूंनी मुंबईत हजेरी लावायला सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत दिली आहे.
इंग्लंडला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंना १४ दिवस मुंबईत विलगिकरणात राहावे लागणार आहे. त्यांनतर २ जूनला पुरुष आणि महिला संघाचे खेळाडू एकत्रच इंग्लंडला रवाना होणार आहेत. त्यामुळे बुधवारी (१९ मे) रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मयंक अगरवाल आणि वॉशिंग्टन सुंदर हे खाजगी विमानातून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत भारतीय महिला संघातील खेळाडू मिताली राज हीदेखील मुंबईला पोचोहचली आहे.
बीसीसीआयने या खेळाडूंचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच कॅप्शन म्हणून त्यांनी, ‘प्रथम स्टॉप मुंबई’ असे लिहिले आहे.
First stop, Mumbai 📍#TeamIndia pic.twitter.com/Dieotl3GrF
— BCCI (@BCCI) May 19, 2021
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.
टी२० मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहाद्दूर.