---Advertisement---

विक्रमतोड खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मितालीचे ‘राज्य’, बनली महिला क्रिकेटची ‘मास्टर ब्लास्टर’

On: रविवार, जुलै 4, 2021 8:58 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यादरम्यानची वनडे मालिका नुकतीच पार पडली आहे. शनिवार रोजी (०३ जुलै) वोर्सेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्याने या मालिकेचा शेवट झाला. कर्णधार मिताली राज हिच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने ४ विकेट्स राखून इंग्लंडवर मात केली आणि मालिकेत क्लिन स्विप होण्यापासून संघाचा बचाव केला. तिच्या मोठ्या खेळीसह तिने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

३८ वर्षीय मितालीने इंग्लंडविरुद्ध टिच्चून फलंदाजी करत डावाखेर नाबाद ७५ धावांची शानदार खेळी केली. ८६ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने तिने ही धावसंख्या उभारली. यासह ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तब्बल १०३३७ धावा करत तिने चार्लोट एडवर्ड्सचा सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. एडवर्ड्स १०२७३ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.

याचबरोबर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करताच एक अनोखा योगायोगही जुळून आला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर याच्या नावे सर्वाधिक धावांच्या विक्रमाची नोंद आहे. मास्टर ब्लास्टरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४३५७ धावा फटकावल्या होत्या.

विशेष बाब अशी की, महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या या दोन्ही दिग्गजांनी एकाच वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हा अशक्यप्राय विक्रम कदाचित भविष्यात कोणीही मोडू शकणार नाही. मितालीने १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्ध वयाच्या १६ व्या वर्षी २०५ दिवसांचे असताना पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यावेळी त्याचे वय १६ वर्षे २०५ दिवस इतके होते.

याखेरीज मिताली कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. कर्णधार म्हणून खेळताना तिने ६००० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. याबाबतीत केवळ इंग्लंडची कर्णधार चार्लोट एडवर्ड्स तिच्या पुढे आहे.

तसेच इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना जिंकत मिताली महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारी कर्णधारही बनली आहे. तिने आतापर्यंत सर्वाधिक ८४ वनडे सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

नाद करा पण आमचा कुठं! गोलंदाज झुलन गोस्वामीची विश्वविक्रमी कामगिरी, आजवर कोणालाही नाही जमली

भर सामन्यात बेशुद्ध पडलेल्या विंडिजच्या २ महिला क्रिकेटर, रुग्णालयातून आली मोठी अपडेट

स्म्रिती मंधानाने बाउंड्रीजवळ टिपला अप्रतिम झेल, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुपरवुमन’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---