ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात रविवारी (30 ऑक्टोबर) तीन सामने खेळले जातील. दिवसातील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स (PAKvNED) यांच्या दरम्यान खेळला जाईल. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार व सर्वकालीन महान क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) ही समालोचक म्हणून आपले पदार्पण करणार आहे. त्यानंतर ती भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात देखील समालोचनाची जबाबदारी पार पाडेल. (Mithali Raj Debuting As Commenter)
जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये समावेश असलेल्या मिताली राज (Mithali Raj) हिने यावर्षीच क्रिकेटला अलविदा केला होता. 39 वर्षीय मिताली त्यानंतर आता आपली सेकंड इनिंग सुरू करणार आहे. पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात प्रथमच तिचा आवाज समालोचकाच्या स्वरूपात चाहत्यांना ऐकायला मिळेल. 22 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली मिताली स्टार स्पोर्ट्सवर तेलुगु, हिंदी व इंग्लिश समालोचकांच्या चमूत सहभागी होईल. दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तसेच दिवसातील अखेरचा सामना असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यातही ती समालोचन करताना दिसेल.
मितालीने नुकतेच बीसीसीआयने घेतलेल्या समान वेतन पद्धतीचे स्वागत केले होते. बीसीसीआयने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान सामना वेतन देण्याची घोषणा केली आहे. तीने ट्विट करत लिहिले होते, ‘भारतीय महिला क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महिला आयपीएलसोबतच वेतन समानता धोरण हे निर्णय घेतले गेलेत. भारतातील महिला क्रिकेटसाठी एका नव्या युगाची सुरुवात करत आहे. हे घडवून आणल्याबद्दल जय शाह आणि बीसीसीआयचे आभार. हा आनंदाचा दिवस आहे.” मितालीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात जाणार अशा बातम्या येत होत्या. मात्र, तिने आपल्याला महिला आयपीएल खेळण्याची इच्छा आहे असेही म्हटलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘असे’ कर, भारतीय संघाचे नशीब बदलशील! रिषभ पंतला चाहत्याचा भन्नाट सल्ला
भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजांना घाबरतात? प्रशिक्षकांनी दिले ‘असे’ उत्तर