---Advertisement---

लुका मोड्रिच ठरला युरोपियन ‘प्लेयर ऑफ दी इयर’

---Advertisement---

युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युइएफए) २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरचा मान रियल माद्रिदचा लुका मोड्रिचला मिळाला. तसेच तो उत्कृष्ठ मिडफिल्डरही ठरला आहे.

मोड्रिच बरोबर जुवेंट्सचा क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लीव्हरपूलचा मोहमद सलाह यांचीही युरोने प्लेयर ऑफ दी इयर म्हणून निवड केली होती. या दोघांना मागे टाकत मोड्रिचने बाजी मारली.

ही निवड मागील हंगामाच्या चॅम्पियन लीग आणि युरोपा लीगच्या ८० प्रशिक्षकांनी मिळून केली आहे. तसेच यामध्ये ५५ पत्रकारांचाही समावेश होता जे या लीगचे सभासद होते.

मोड्रिच हा २०१८ फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट विजेता आहे. यावेळी त्याला प्रशिक्षक आणि पत्रकारांकडून सर्वाधिक मते मिळाली.

या पुरस्काराबरोबरच युइएफएने आणखी काही उत्कृष्ठ फुटबॉलपटूंना पुरस्कृत केले. यामध्ये उत्कृष्ठ फॉरवर्ड म्हणून रोनाल्डो, डिफेंडर सर्जियो रॅमोस आणि गोलकिपर रियल माद्रिदचा केलोर नॅवास तर प्रेसिडंट डेव्हिड बेकहम हे विजेते ठरले. तसेच रॅमोसला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळत आहे. मागील हंगामातही तो उत्कृष्ठ डिफेंडर ठरला होता.

महिलांमध्ये वोल्फ्सबर्गच्या पेरनिले हार्डरला प्लेयर ऑफ दी इयरचा पुरस्कार मिळाला.आहे.

https://twitter.com/VfL_Wolfsburg/status/1035213970171408385

कोणाला मिळाला कोणता पुरस्कार?
सर्वोत्कृष्ठ गोलकिपर:- नवास (रियल मॅड्रिड)
सर्वोत्तम बचावपटू:- सर्जीओ रामोस (रियल मॅड्रिड)
सर्वोत्तम मिडफिल्डर:- लुका मोड्रिक (रियल मॅड्रिड)
सर्वोत्तम फाॅर्वर्ड:- क्रिस्टायानो रोनाल्डो (रियल मॅड्रिड)
महिला सर्वोत्तम खेळाडू:- हार्डर
पुरुष सर्वोत्तम खेळाडू:- लुका माॅड्रिक

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कसे आणि कधी होणार युएफा चॅम्पियन्स लीगच्या गटांचे विभाजन?

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment