---Advertisement---

रनमशीन कोहलीसाठी ‘या’ गोलंदाजांची फिरकी ठरतेय डोकेदुखी, सर्वाधिकवेळा झालाय बाद

On: सोमवार, सप्टेंबर 6, 2021 2:57 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. दरम्यान, पहिल्या डावातील खराब सुरुवातीनंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. या डावादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ४४ धावा केल्या. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कोहलीला बाद केले. यासह मोईनने एक विक्रम देखील प्रस्थापित केला.

कोहली ४४ धावांवर असताना मोईन अलीने त्याला बाद केले. असे करत मोईन अली विराटला सर्वाधिक वेळा बाद करणारा अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू ठरला आहे. मोईनने कोहलीला आतापर्यंत १० वेळा बाद केले आहे.

विराटला सर्वाधिकवेळा बाद करणाऱ्या फिरकीपटूंमध्ये मोईन पाठोपाठ इंग्लंडच्याच आदिल रशीदचा क्रमांक लागतो. आदिल रशीदने कोहलीला ९ वेळा बाद केले आहे. त्यानंतर इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वानने कोहलीला ८ वेळा बाद केले. तर ७ विकेट्ससह ऑस्ट्रेलियाचे ॲडम झाम्पा आणि नॅथन लायन दोघेही संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, पहिल्या डावात ९९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. रोहित शर्माच्या १२७ धावांच्या शतकी खेळीसह शार्दुल ठाकूर (६०), रिषभ पंत(५०), चेतेश्वर पुजारा(६१) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे दुसऱ्या डावात भारतीय संघाने ४६६ धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडला आता ३६८ धावांचे आव्हान मिळाले आहेत.

यादरम्यान इंग्लंडकडून गोलंदाजी करताना ख्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ओली रॉबिन्सन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर जो रूट, जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांना प्रत्येकी १ विकेट्स मिळाली. (Spinners dismissing Virat Kohli most times in international cricket)

या मालिकेत आतापर्यंत झालेल्या ३ कसोटी सामन्यात दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. त्यामुळे हा चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात मिळालेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या. सध्या इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स आणि हसीब हमीद दोघेही नाबाद खेळत आहेत.

महत्वाच्या बातम्या –
चाहत्यांसाठी काहीही!! शेन वॉर्नने चक्क प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन पूर्ण केली भारतीय क्रिकेटप्रेमीची इच्छा, पाहा व्हिडिओ
बाप ‘बाप’ असतो! तब्बल १० महिन्यांनी वसीम अक्रम भेटला आपल्या मुलीला, इमोशनल व्हिडिओ केला शेअर
कोहलीने प्रथम श्रेणीत १०,००० धावांचा टप्पा तर पार केला, मात्र ‘या’ दिग्गजांना पछाडण्यात अपयशी ठरला

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---