अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. तसेच चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिल्याच सत्रात इंग्लंड संघाचे ३ गडी गारद केले होते. तसेच मोहम्मद सिराजने इंग्लंड संघाच्या महत्त्वाच्या फलंदाजाला अवघ्या ५ धावांवर माघारी धाडले आहे.
सिराजने दुसऱ्या सत्रातील पहिले षटक टाकताना रुटला अतिशय वेगवान चेंडू टाकला आणि तो चेंडू रूटला कळायच्या आधीच त्याच्या पॅडला जाऊन धडकला. त्यानंतर सिराजने जोरदार अपील केल्यावर अंपायरने बादचा इशारा केला. अशाप्रकारे सिराजने चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
पहिल्या सत्रात भारतीय संघ आघाडीवर
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनतर इंग्लंड संघाच्या सलामीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. जॅक क्रावली अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. तर डॉमिनिक सिबली २ धावा करत बाद झाला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी २ गडी बाद करण्यात यश आले आहे.
brilliant bowling from #Siraj #Root gone for 5 #INDvENG pic.twitter.com/hxrf0wndd5
— Sathyagrahi (@BhagathChegu) March 4, 2021
जो रूट ठरला अपयशी
पहिल्याच सामन्यात २१८ धावा करणारा इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट हा पुढील ३ सामन्यात अपयशी ठरला आहे. त्याला पुढील सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने या मालिकेत एकूण ३३८ धावा केल्या आहेत. तसेच चौथ्या सामन्यातही तो ५ धावाच करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 4th Test Live: इंग्लंडचे आघाडीचे ४ फलंदाज तंबूत, सिराजने बेयरस्टोला धाडलं तंबूत
अक्षरने बिघडवली इंग्लंडची सुरुवात, ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच स्पिनर
अक्षरच्या घातक फिरकीने इंग्लंडच्या सलामीवीराची उडाली दांडी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल