इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल इतिहासातील ख्रिस गेल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. गेल त्या निवडक खेळाडूंपैकी एक आहे ज्याने आयपीएलच्या जवळपास सगळया हंगामात सहभाग नोंदवला आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीने गेल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्यामुळे मैदानातील घडामोडी असो वा मैदानाबाहेरील, गेल कायमच चर्चेत असतो.
गेल सध्या पंजाब किंग्जच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेलतो आहे. त्याचा या संघातील सहकारी मोहम्मद शमीने नुकत्याच गेल बाबतच्या काही खास गोष्टींचा खुलासा केला. गेलच्या भारताबद्दल असलेले प्रेम शमीच्या खुलाशांनी समोर आले.
हिंदीसह ‘ही’ भारतीय भाषा देखील शिकला गेल
मोहम्मद शमी यावेळी म्हणाला, “ज्याप्रमाणे आम्ही हिंदी बोलतो, गेल देखील तसेच हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला हिंदीत गंमत करायला खूप आवडते. इंग्लिश मध्ये बोलता बोलता तो मधेच हिंदी बोलायला लागतो. इतकेच नव्हे तर तो आता हळूहळू पंजाबी बोलायला देखील शिकला आहे. आमच्या संघातील पंजाबी बोलता येणारे खेळाडू त्याला पंजाबी शिकवत आहेत.”
शमी पुढे म्हणाला, “गेल २० वर्ष झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे. त्याच्याकडे खूप जास्त अनुभव आहे. तो एक उत्तम माणूस आहे. आणि त्याला भारतीय संस्कृति बद्दल देखील विशेष प्रेम आहे.”
पंजाब किंग्जच्या संघाकडून खेळण्यापूर्वी गेल कोलकाता नाइट राइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघांचा भाग होता. गेल आयपीएल इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. तसेच आयपीएल इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या १७५ ही देखील गेलच्याच नावे आहे.
महत्वाच्या बातम्या:
दीपक चहरने विनंती करूनही का नाही घेतले डीआरएस? खुद्द धोनीनेच केला खुलासा
वार्षिक करारातील जडेजाच्या श्रेणीवरून होतोय वाद, वॉननंतर माजी भारतीय खेळाडूचीही टीका





