---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळणार का? पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने दिले ‘हे’ उत्तर 

On: रविवार, मे 23, 2021 11:46 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर सध्या इंग्लंडचे नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे मागील काही काळापासून मोहम्मद आमीरची आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर आमीरला इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले तर तो आयपीएलमध्ये खेळू शकतो असे बोलले जात आहे. आमीरने मात्र आता या सर्व चर्चांबद्दल स्वतः पुढे येत माहिती दिली आहे.

एका युट्यूब चॅनेलशी बोलताना आमीर म्हणाला की, या सर्व चर्चा कशा सुरू होतात याचे त्याला आश्चर्य वाटते. आमीरने सांगितले की त्याची पत्नी ही ब्रिटिश नागरिक आहे आणि त्यामुळे तो ब्रिटिश नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. आमीरने असेही म्हटले आहे की त्याची मुलेही ब्रिटनमध्येच शिकतील.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत आमीर म्हणाला, ‘आयपीएलमध्ये मी खेळणार असल्याची चर्चा का सुरू आहे हे मला अजिबात समजत नाही. मी पाकिस्तानव्यतिरिक्त कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करणार नाही.’

आमीर पुढे म्हणाला की, ‘माझी पत्नी ब्रिटीश आहे, म्हणून माझ्याकडे तेथील कार्ड आहे. यापूर्वीही पाकिस्तानी खेळाडूंकडे यूकेचा पासपोर्ट होता. आताच माझ्या नावावर इतकी चर्चा का होत आहे हे मला समजत नाही.’

आमीर पुढे म्हणाला की, ‘माझ्या मुलांना ब्रिटनमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. परंतु माझे येथील कार्ड संपण्यास अजून दोन वर्षे बाकी आहेत. जेव्हा ते संपेल, तेव्हा पासपोर्टबद्दल बोलले जाईल. परंतु, म्हणून माझ्याबद्दल खोटी बातमी पसरवू नका. काही बातम्यांचे चॅनल प्रसिध्दीसाठी अशा बातम्या पसरवत आहे.’

दरम्यान मोहम्मद आमीरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला असता त्याने पाकिस्तानकडून 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 51 टी20 सामने खेळलेले आहेत. यामध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 119, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 81 आणि टी20 क्रिकेटमध्ये 59 बळी मिळवलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

तुझ्या वक्तव्याबद्दल सलाम! साहाने रिषभ पंतबद्दल सद्भावनेने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल अगदी पाकिस्तानमधून होतंय कौतुक

बंदीसाठी बाबा अन् मी जबाबदार! पृथ्वी शॉने कारकिर्दीतील कठीण काळाबाबत दिली मोठी प्रतिक्रिया

कट्टर फुटबॉलप्रेमी असलेल्या ‘या’ शहरात आता उभारले जाणार क्रिकेट स्टेडियम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---