पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने एक महिन्यापूर्वी आंतराष्ट्रीय पातळीवरून अचानक निवृत्ती घेवून सर्वांना धक्का दिला होता. त्याने वयाच्या 29 वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यान संघ व्यवस्थापकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची आरोप सुद्धा केले होते. मात्र तो आत पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार आहे, परंतु त्यासाठी त्याची एक अट आहे.
पाकिस्तान संघासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेणे आणि पुन्हा निवृत्ती मागे घेणे ही नवीन गोष्ट नाही. कारण पाकिस्तान मध्ये या गोष्टी बर्याच वेळा घडल्या आहेत. त्यामुळे या यादीत मोहम्मद आमिर याचा ही समावेश होवू शकतो. पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने संघ व्यवस्थापकांच्या त्रासाला कंटाळून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर संघ व्यवस्थापकांवर ताशेरे ओढले होते. त्याचबरोबर त्याने एक व्हिडिओ शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली होती.
पाकिस्तानच्या क्रीडा पत्रकाराने आमिरचे वक्तव्य जारी करताना लिहले की, तो पुन्हा राष्ट्रीय संघात निवड करण्यासाठी उपलब्ध होवू शकतो. परंतु यासाठी त्याने पीसीबीच्या समोर एक अट ठेवली आहे. ट्विट करताना पाकिस्तानचा क्रीडा पत्रकाराने लिहले, “जर नव्या संघ व्यवस्थापकांना नेमले गेले तर मी मंडळाला या गोष्टीची माहिती देईल की तो राष्ट्रीय संघात निवड करण्यासाठी उपलब्ध आहे.”
त्याने पुढे लिहले, “जर मी भविष्यात संघ निवडीसाठी उपलब्ध असेल तर माझी निवड फक्त या कारणासाठी केली नाही पाहिजे की, माझे मोहम्मद आमिर आहे. उलट मी चांगली कामगिरी करेन आणि स्वतःला इतरांपेक्षा चांगले सिद्ध करेन ज्यामुळे निवड होण्यासाठी मी पात्र ठरेल. ”
आमिरचे म्हणणे होते की, “वकार युनिस हा एक दिग्गज वेगवान गोलंदाज राहिला आहे आणि मिसबाह उल हक सुद्धा एक चांगला कर्णधार राहिला आहे. मात्र खेळाडू सोबत कोचिंग करताना त्यांची मानसिकता पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे नेहमी असे होत नाही की, जो चांगला खेळाडू आहे, तो एक चांगला कोच होवू शकतो. ”
महत्वाच्या बातम्या:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : उत्तर प्रदेशचा सलग तिसरा पराभव, सुरेश रैना पुन्हा अपयशी
अनिल कुंबळे म्हणजे गोलंदाजीतला राहुल द्रविड, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाची स्तुतिसुमने