पाकिस्तानचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने पुन्हा एकदा पाकिस्तान संघासाठी खेळण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. आमिरने 2020मध्ये पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. नुकतेच त्याच्यासोबतचा गोलंदाज वहाब रियाज याने संकेत दिले होते की आमिर पाकिस्तान संघात पुनरागमन करु शकतो. याचा खुलासा वहाबने माध्यमांशी बोलताना म्हणाला की आपण आमिरला पुन्हा एकदा पुनरागमन करु शकतो.
मागच्या काही दिवसात पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये नाटकीय गोष्टी बघायला मिळाल्या. पीसीबीच्या अध्यक्षांना बरखास्त करण्यात आले. माजी पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांची हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याने आपल्या भविष्याबद्दल मोठे भाकित केले. आमिर माध्यमांशी चर्चा करताना म्हणाला की, “जर ईश्वराला वाटले तर मा पुन्हा पाकिस्तान संघासाठी पुनरागमन करु शकतो आणि चांगले प्रदर्शन करु ईच्छितो. ”
सध्या मोहम्मद आमिर बांगलादेश प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामासाठी प्रशिक्षण घेत आहेत. आमिर याने बांगलादेशमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल पीसीबी अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) यांचे आभार मानले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आपला शेवटचा सामना 2020मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली होती, पण त्याने जगभरातील टी20 लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. आता पुन्हा एकदा या वेगवान गोलंदाजाला पुनरागमनाची अपेक्षा आहे.
मोहम्मद आमिर हा प्रचंड गुणवत्ता असलेला गोलंदाज आहे. त्याने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या नाकी नऊ आणले होते. या सामन्यात त्याने भारतीय फलंदाजीची वरची फळी गार केली होती. त्याने पहिल्याच षटकात भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला तंबूत पाठवले. त्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनाही झटपट बाद केले. मोहम्मद आमिरच्या या प्रदर्शनामुळे भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताचे कारण स्पष्ट! उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून खुलासा
आता भारतासाठी पदार्पण करणे सोपे नाही! बीसीसीआयच्या आढावा बैठकीत घेतला गेला मोठा निर्णय