मुंबई । वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर लवकरच इंग्लंड दौर्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघात सामील होणार असल्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे. वैयक्तिक कारणास्तव या दौऱ्यावर जाण्यास त्याने नकार दिला होता. 20 जून रोजी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर्यावर रवाना झाला होता.
पाकिस्तानचा संघ इंग्लंडला कसोटी आणि टी -20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पोहोचला आहे. पाकिस्ताच्या संघाने क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर कसोटी मालिकेची तयारी करीत आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने इंग्लंड दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले होते. तो लवकरच संघात सामील होणार आहे. मुलीच्या जन्मामुळे या दौर्यावर पाठवू नये, अशी विनंती त्याने पीसीबीला केली होती.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला आमिर टी -20 मालिकेपूर्वी संघात दाखल होईल. तसेच इंग्लंडमधील नॅशनल हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये मोहम्मद इम्रानला पाठवण्याची संघ व्यवस्थापनाची विनंती पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही मान्य केली आहे.
अष्टपैलू शोएब मलिकचा इंग्लंड दौरा ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहितीही पीसीबीने दिली आहे. भारताने आपल्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जुलैपर्यंत बंद केली आहे आणि त्यामुळे मलिक कुटुंबाला भेटू शकत नाही. मलिक मँचेस्टर येथे होणार्या टी 20 मालिकेसाठी 28 ऑगस्ट रोजी संघात दाखल होईल.






