पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडला होता. आमिरने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याला संघात घेण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (23 सप्टेंबर) पाकिस्तान संघ घोषित झाल्यानंतर मुख्य निवडकर्ते इंजमाम उल हक यांनी आमिरला संघात पुनरागमनाचा मार्ग सांगितला आहे.
मोहम्मद आमिर () याने संघ व्यवस्थापनाकडून चुकीची वागणूक मिळत असल्याचे कारण देत, 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी वेगवान गोलंदाज अवघ्या 28 वर्षांचा होता आणि तुफान फॉर्ममध्ये देखील होता. आमीर मागच्या दोन वर्षांमध्ये जगभरातील लीग क्रिकेटमध्ये सहभाग घेतो. सध्या तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. जमैका तलावाह हे त्याच्या संघाचे नाव आहे. असे असले तरी, मोहम्मद आमिर पाकिस्तानसाठी खेळत नसल्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा होत असते. काही दिवसांपूर्वी नसीम शाह याला दुखापत झाली, ज्यामुळे आगामी विश्वचषकात तो पाकिस्तानसाठी खेळू शकणार नाही. नसीम शाहच्या अनुपस्थितीत आमिरचे नाव चर्चेत होते. पण विश्वचषक संघात आमिरचे पुनरागमन झाले नाही. शुक्रवारी विश्वचषकासाठी पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ घोषित झाल्यानंतर इंजमाम उल हक यांनी स्वतः आमिरला पुनरागमनासाठी मार्ग दाखवला.
पाकिस्तानचे मुख्य निवडकर्ते असलेल्या इंजमामच्या मते कोणत्याही खेळाडूला राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावे लागते. आमिरनेही तसे केले, तर संघाचे मार्ग त्याच्यासाठी खुले आहेत, असे इंजमामला वाटते. माध्यमांसमोर इंजमाम म्हणाले, “आमिर एक महान क्रिकेटपटू राहिला आहे. पण त्याने निवृत्ती घेतली आहे. जर त्याला पाकिस्तानसाठी पुन्हा खेळायचे असेल, तर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावे लागेल. जर त्याठिकाणी तो चांगले प्रदर्शन करू शकला, तर त्याच्या नावावर विचार केला जाऊ शकतो. कोणासाठीची संघाचे दरवाचे बंद नाहीत. सरफराज अहमद, शान मसूद आणि इमाद वसीम यांच्याबाबत देखील असेच आहे.” (Mohammad Amir will have to play domestic cricket before making a comeback in the Pakistan team)
2023 वनडे विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ: बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फकर जमान, हारिस रऊफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान आगा, सऊद शकील, शाहीन शाह अफरीदी, उसामा मीर.
राखीव खेळाडू – मोहम्मद हैरिस, इबरार अहमद, जमान खान
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
भारताचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला! मोहालीत ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा गर्वही तुटला; कॅप्टन राहुलची कमाल





