---Advertisement---

आयपीएल २०२१: पडीक्कलच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूला मिळू शकते आरसीबी संघाकडून पदार्पणाची संधी

On: बुधवार, एप्रिल 7, 2021 2:48 AM
---Advertisement---

युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० मध्ये युवा खेळाडू देवदत्त पडीक्कलने मिळालेल्या संधीचे सोने करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. पडीक्कलने १४ सामन्यात ४७३ धावा केल्या होत्या. आयपीएलचे १४ वे हंगाम सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का बसला आहे. देवदत्त पडीक्कलची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात असा एक खेळाडू आहे जो पडीक्कलचा जागी महत्वाची भूमिका बजावू शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची पहिली लढत ५ वेळेचे आयपीएल विजेत्या बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध ९ एप्रिल रोजी रंगणार आहे. या मोठ्या सामन्यात देवदत्त पडीक्कलचे खेळणे कठीण आहे. त्यामुळे विराट कोहलीसोबत मोहम्मद अझहरुद्दीन डावाची सुरुवात करू शकतो.

मोहम्मद अझहरुद्दीनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ लिलावात २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.

मोहम्मद अजहरुद्दीन देशांतर्गत होणाऱ्या सामन्यांमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच तो केरळ संघासाठी सलामी फलंदाजी देखील करतो. त्याने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने ५ सामन्यात २१४ धावा केल्या होत्या. तसेच एका सामन्यात त्याने अवघ्या ५४ चेंडूत १३७ धावांची खेळी केली होती.

आयपीएल २०२१ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, जोश फिलिप (यष्टीरक्षक), एबी डिविलियर्स (यष्टीरक्षक), पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डेनियल सॅम्स, युजवेंद्र चहल, ऍडम झम्पा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, काइल जेमीसन, डॅनियल ख्रिस्टियन, सुयश प्रभुदेसाई आणि केएस भारत.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, ‘हे’ दोन प्रमुख खेळाडू सीएसकेविरुद्धच्या सामन्याला मुकणार

वाह! क्रिकेटवरील चर्चेसाठी ‘द वॉल’ राहुल द्रविडला ‘या’ देशातून आले आमंत्रण

कर्णधार म्हणून धोनीच्या चेन्नईविरुद्ध पहिलाच सामना खेळण्याबद्दल रिषभ पंतने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---