पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीज (mohammad hafeez) याने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर त्याने मॅच फिंक्सिंग करणाऱ्यांना कधीच देशासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही पाहिजे, असे सांगितले. निवृत्तीनंतर त्याने लाहोरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाला, तो स्वतःच्या भूमिकेवर कायम आहे की, मॅच फिक्सिंग करणारे आणि देशाला धोका देणाऱ्यांना कधीच खेळण्याची परवानगी दिली नाही पाहिजे.
हफीजने यावेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात निराशाजनक प्रसंगाची आठवण काढली आणि पीसीबीने एका भ्रष्ट खेळाडूमुळे त्याला संघातून बाहेर जाण्यासा सांगितले होते, असा खुलासा केला. पीसीबी अध्यक्ष रमीज राजांना उद्देशून हफीज म्हणाला की, “माझ्यासाठी कारकिर्दीची सर्वात मोठी निराशा आणि मोठी बाधा तेव्हा आली होती, जेव्हा मी आणि अजहर अलीने या मुद्यावर तत्वनिष्ट दृष्टीकोण घेतला. परंतु, बोर्डाच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगितले की, आम्ही जरी नाही खेळलो तरी चालेल, पण संबंधित खेळाडू खेळणार.”
रमीज राजांवर निराश नाही
पीसीबी अध्यक्षांनी जरी त्यावेळी हफीजला चुकीची वागणूक दिली असली, तरी तो त्यांच्यावर निराश नाही, असे त्याने पुढे सांगितले. तो पुढे बोलताना म्हणाला की, “जोपर्यंत या गोष्टीचा प्रश्न आहे की, रमीज राजांना काय म्हटले किंवा त्यांना काय वाटले, तर तो त्यांचा वैयक्तिक दृष्टीकोण आहे. मी नेहमीच टीकाकारांचा सन्मान केला आहे. माझी पद्धत मैदानावर उतरून त्यांना उत्तर देणे आहे. मी बोर्डमध्ये कोणावरच निराश नाहीये.”
२०१९ मध्येच घेणार होता निवृत्ती
हफीजने यावेळी सांगितले की, तो २०१९ पासून निवृत्तीचा विचार करत होता. तो म्हणाला, “मी २०१९ विश्वचषकापासून निवृत्तीविषयी विचार करत होतो. मात्र, माझी पत्नी आणि काही शुभचिंतकांनी मला खेळत राहण्यासाठी तयार केले. पण मी तेव्हापासून याविषयी विचार करत होतो.”
महत्वाच्या बातम्या –
भारत-आफ्रिका सामन्यात पंचगिरी करणाऱ्या ‘अल्लाउद्दीन पालेकर’ यांचे कोकण कनेक्शन
मनिंदर-नबीबक्षच्या ‘सुपर टॅकल’ने बंगालचा विजयरथ कायम! अटीतटीच्या सामन्यात जयपूरचा पराभव
निलंबन ते टीम इंडियाचा कर्णधार; तीन वर्षांत उजळले राहुलचे भाग्य
व्हिडिओ पाहा –




