पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज याने नुकतेच भारतीय दिग्गज रोहित शर्मावर निशाणा साधला होता. त्याच्या या विधानानंतर सोशल मीडियावर चाहते चांगलेच भडलके होते. अशातच आता हाफीजने अजून एक मोठे विधान करून भारतीय क्रिकेटवर निशाणा साधल्याचे समोर आले आहे. त्याने पाकिस्तानच्या एका माध्यामावर झालेल्या चर्चेचा व्हिडिओ शेअर केला आहे. हाफीजच्या मते भारताच्या तुलनेत इतर संघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सावत्रपणाची वागणूक मिळत आहे.
मोहम्मद हाफीज (Mohammad Hafeez) याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओ हाफीज म्हणत आहे की, “आयसीसी आणि एसीसी दोघांनाही भारतीय संघ आवडतो, कारण तो त्यांचा कमावता मुलगा आहे.” भारतीय संघाला आयसीसी आणि एसीसीकडून मिळाणाऱ्या समर्थनाविषयी प्रश्न विचारला गेल्यावर हाफीज म्हणाला की, “आपल्या नात्यागोत्यात जो कमावता मुलगा असतो, त्याला सर्वात जास्त प्रेम मिळते. तो सर्वांचा लाडका असतो.”
“भारतीय संघ जो एक कमाई करून देणारा देश आहे. जगात कुठेही सिरीज असली आणि त्यांचा संघ त्याठिकाणी गेला, तर स्पॉनरशिप मिळते. त्यांचा एक वेगळाच अंदाज आहे.” कार्यक्रमात त्याला प्रश्न विचारला गेला की, “भारत लाडका फक्त त्यांच्या चांगल्या क्रिकेटसाठी आहेत की, लाडके यामुळे आहेत की, चांगले पैसे कमावून देतात.” माजी दिग्गज या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात देत म्हणाला की, “दुसरी गोष्ट योग्य आहे.” या व्हिडिओत स्पष्ट होते की, भारतीय संघाला पैशांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिक महत्व मिळत आहे.
Laadla 😍 pic.twitter.com/V48JqojFmc
— Mohammad Hafeez (@MHafeez22) September 2, 2022
दरम्यान, भारतीय संघाने आशिया चषकात चमकदान कामगिरी केली. ग्रुप स्टेजच्या दोन सामन्यांमध्ये भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि हाँगकाँग संघाविरुद्ध विजय मिळवला होता. असे असले तरी हाफीजच्या मते भारतीय संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. हाफीजच्या मते रोहित जे बोलत आहे, ते खेळताना प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
काय रे हे? टीम इंडियासाठी खेळतोय कमी आणि दुखापतग्रस्त जास्त झालाय जडेजा
पाकिस्तानी सलामीवीराची भारताला उघडपणे चेतावणी; सुपर-4 सामन्यापूर्वी म्हणाला, ‘आम्ही…’
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात