नुकेतच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आपल्या कसोटी कारकिर्दीबाबत बोलतांना खंत व्यक्त केली होती. जवळपास सात वर्षे कसोटी संघात संधी मिळण्याची प्रतिक्षा करून देखील त्याला कसोटीत सातत्याने संधी मिळाल्या नाही. यावर खंत व्यक्त करतांना त्याने बहुतेक पुढच्या जन्मीच कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळेल, अशा शब्दात आपली नाराजी प्रकट केली. यावर आता त्याचा एकेकाळचा सहकारी मोहम्मद कैफने प्रतिक्रिया दिली आहे.
युवराजच्या रिप्लायवर कैफची प्रतिक्रिया
‘विस्डेन इंडिया’ने काही दिवसांपूर्वी युवराज सिंगच्या छायाचित्रासह चाहत्यांना प्रश्न विचरला होता की, ‘कोणता माजी क्रिकेटपटू भारतासाठी अधिक कसोटी खेळायला हवा होता?’ यावर युवराजने रिप्लाय देताना लिहिले होते की, ‘शक्यतो आता हे पुढच्या आयुष्यात होईल! तिथे मी ७ वर्ष बारावा खेळाडू नसेल.’ युवराजच्या याच रिप्लायवर आता कैफने आपले मत प्रदर्शित केले आहे.
कैफने युवराजला रिप्लाय देताना त्याची प्रशंसा केली आहे. कैफने त्याच्या कमेंटमध्ये म्हणतो, “ऑस्ट्रेलिया विरुद्ध तुझ्या २००० सालच्या पहिल्या खेळीपासून ते २०११ च्या विश्वचषक विजयापर्यंत! तू याच आयुष्यात अनेक सोनेरी क्षणांच्या आठवणी निर्माण केल्या आहेस. त्यामुळे पुढील जन्माची चिंता कशाला भावा!” थोडक्यात कैफने युवराजला त्याच्या मर्यादित षटकांच्या सामन्यातील शानदार कामगिरीचे आठवण करून देत केवळ कसोटी क्रिकेटमध्ये संधी न मिळाल्याची खंत बाळगू नकोस, असाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
From your first knock in 2000 vs Australia till the 2011 World Cup you created plenty of golden memories in this life itself…why bother about agla Jeevan, Bhai 🙂
— Mohammad Kaif (@MohammadKaif) May 24, 2021
युवराज सिंगची शानदार कारकीर्द
युवराज सिंगला कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून ४० सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने ३३.९३च्या सरासरीने १९० धावा काढल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने संधी मिळाली नसली तरी वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी डोळे दिपवणारी आहे. वनडे क्रिकेटमध्ये ३०४ त्याने सामने खेळतांना ३६.५६ च्या सरासरीने ८७०१ धावा काढल्या आहेत. तर टी२० क्रिकेटमध्ये ५८ सामन्यात २८.०२ च्या सरासरीने ११७७ धावा काढल्या आहेत. २००७च्या टी२० विश्वचषक विजयात आणि २०११च्या वनडे विश्वचषक विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑक्सीजन सिलेंडर लावून स्वयंपाक बनवणाऱ्या आईची मदत करणार वीरू; सोशल मीडियावर केले हे आवाहन