संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेटचे भवितव्य प्रतिभावान खेळाडूंच्या हाती आहे. हे या तिन्ही फलंदाजांनी सिद्ध केले आहे. मोहम्मद कैफचाही असाच विश्वास आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बोलताना कैफ म्हणाला की, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टी20 मालिकेत ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्यांनी टी20 मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची कमतरता भरून काढली आहे. हे तीन खेळाडू आता कोहली आणि रोहितचे योग्य उत्तराधिकारी असल्याचे सिद्ध होत आहेत.
भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने टी20 मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा वारसा पुढे नेल्याबद्दल सॅमसन, तिलक आणि अभिषेकचे कौतुक केले. टीम इंडियाच्या दोन्ही दिग्गजांनी वेस्ट इंडिज आणि युएई येथे झालेल्या आयसीसी टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर सर्वात लहान फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. युवा खेळाडूंनी संघाला टी20 मध्ये आणखी एका उंचीवर नेण्याची विराट आणि रोहितची इच्छा होती. या तिन्ही क्रिकेटपटूंची फलंदाजी पाहून कोहली आणि शर्माला खूप समाधान वाटेल. असे कैफला वाटते.
कैफने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहले आहे की, भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात सोडले आहे. मोहम्मद कैफची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
Watching Tilak Verma, Abhishek Sharma, Sanju Samson score runs in South Africa’s tough batting conditions must be pleasing for Virat and Rohit. When it comes to T20, they have left Indian cricket in safe hands. #SAvIND
— Mohammad Kaif (@MohammadKaif) November 14, 2024
संजू सॅमसनला संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. शतकानंतर त्याने आफ्रिकेविरुद्ध सलग दोनदा शून्यावर बाद होण्याचा अवांछित विक्रम रचला आहे, कारण अभिषेकही त्याच्या फॉर्मशी झुंजत आहे. कारण पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सरासरी होती. परंतु त्याने शानदार अर्धशतक झळकावले. दरम्यान तिलक वर्मानेही तिसऱ्या टी20 मध्ये शानदार शतक झळकावून धमाका केला होता.
हेही वाचा-
इतिहास घडला! मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या!
IND vs AUS: विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, सराव सामन्यातही धावा निघेना!
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील ऑलटाइम प्लेइंग 11, वीरेंद्र सेहवागसह या दिग्गज खेळाडूंचा समावेश