ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये कसोटी मालिकेनंतर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (३१ मार्च) लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला. पाकिस्तानच्या विजयाचा खरा नायक राहिला कर्णधार बाबर आझम. ऑस्ट्रेलियाच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आझमने कर्णधार खेळी केली आणि पाकिस्तानला चित्तथरारक विजय मिळवून दिला. यानंतर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने आझमचे तोंडभरून कौतुक केले आहे.
आझमची विक्रमतोड खेळी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर ३४८ धावा केल्या. बेन मॅकडरमटचे शतक आणि ट्रॅविस हेडच्या झुंजार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही भलीमोठी धावसंख्या उभारली होती. मॅकडरमटने ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या होत्या. तर हेडने सलामीला फलंदाजीला येत ८९ धावांची शानदार खेळी केली होती.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचे (PAK vs AUS) ३४९ धावांचे आव्हान पार करणे अशक्य दिसत होते. परंतु पाकिस्तानच्या आघाडीच्या ३ फलंदाजांनी संघाला दमदार सुरुवात करून देत सामना आपल्या बाजूने फिरवला. फखर जमान आणि इमाम-उल-हक (Imam-Ul-Haq) यांनी सलामीला फलंदाजीला येत पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. फखर जमान वैयक्तिक ६७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) मैदानावर सेट झालेल्या इमाम-उल-हकला साथीला घेत डाव पुढे नेला.
इमा-उल-हकने वैयक्तिक १०६ धावा केल्या. ९७ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा फटकावल्या. तर आझम ८३ चेंडू खेळताना १ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११४ धावा केल्या. त्यांच्या या शानदार खेळींच्या (Centuries Of Azam & Imam) जोरावर पाकिस्तानने ४९ षटकांमध्येच ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण केले आणि ६ विकेट्स राखून सामना खिशात घातला. आझमने या खेळीसह अनेक विक्रम केले. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
Babar has skills, technique and jigar. The perfect mix when you are chasing a big total. @babarazam258 pic.twitter.com/jL0bgaEyM1
— Mohammad Kaif (@MohammadKaif) April 1, 2022
मोहम्मद कैफचे कौतुकास्पद ट्वीट
त्याच्या या शानदार खेळीवर खुश होत कैफने आझमचे कौतुक करणारे ट्वीट केले आहे. त्याने ट्वीटमध्ये आझमचा फोटो जोडत लिहिले आहे की, “बाबरकडे कौशल्य आहे, तंत्र आहे आणि सर्वात महत्त्वाचे जिगर आहे. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना या गोष्टींचे परिपूर्ण मिश्रण असावे लागते.”
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या सुरुवातीलाच गंटागळ्या खाणाऱ्या सीएसकेबद्दल ऑसी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला…
दिल मिल गये..! धमकीपर्यंत गेलेले वैर विसरून मित्र बनले कृणाल-दिपक, चेन्नईविरुद्ध आला प्रत्यय
पाकिस्तानचा आझम भारताच्या कोहलीला ठरला सरस, पंधरावे वनडे शतक ठोकत केला ‘वर्ल्डरेकॉर्ड’