भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी ( 22 मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर अनेकांनी वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने बेजबाबदार फटका मारल्याचे म्हटले. आता या यादीमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे.
विजयासाठी मिळालेल्या 270 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 35 4 षटकात 4 बाद 185 अशी मजल मारली होती. त्याचवेळी अर्धशतक करून खेळत असलेल्या विराटने उंचावून फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. त्यानंतर हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा हे दबावाचा सामना करू शकले नाहीत व भारतीय संघाला सामना गमवावा लागला. याच मुद्द्यावर बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणाला,
“तो फटका केवळ हवेत मारला होता. विराट शक्यतो असे अतातायी फटके मारत नाही. मात्र, तो फटका मारायची काही गरज नव्हती. आधीच्या षटकातच तुम्ही थोडक्यात बचावलेला होता. ज्यावेळी चेंडू जुना होतो तेव्हा तो खालून मारणे जास्त फायद्याचे ठरते. तुम्हाला तिथेच तुमची ताकद लावावी लागते.”
उभय संघांतील या मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 5 विकेट्सच्या अंतराने सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 10 विकेट्स राखून विजय मिळवलेला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियाने 21 धावांच्या फरकाने नावावर केला. तिसऱ्या सामन्याचा नायक फिरकीपटू ऍडम झंपा ठरला. मिचेल मार्शने या मालिकेत केलेल्या अप्रतिम कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
(Mohammad Kaif Slams Virat Kohli For His Poor Shot Selection In Chennai ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये धोनी दिसणार नवीन भूमिकेत! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘या’ दोन व्यक्तींवर सोपवली गेली बुमराहच्या पुनरागमनाची जबाबदारी! कोच-कॅप्टनलाही नाही मिळणार अपडेट