टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी (13 नोव्हेंबर) खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या थरारक सामन्यात इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवत दुसऱ्यांदा टी20 विश्वविजेते होण्याचा मान पटकावला. या सामन्याआधी पाकिस्तानचे गोलंदाज आणि इंग्लंडचे फलंदाज असे समीकरण पाहायला मिळेल अशा चर्चा सुरू होत्या, मात्र इंग्लंडने सर्व विभागात बाजी मारत सगळ्यांना धक्का दिला. या स्पर्धेत भारत किंवा पाकिस्तान का जिंकला नाही याचे कारण भारताच्या दिग्गज खेळाडूने स्पष्ट केले आहे.
हा विश्वचषक सुरू होण्याआधीच भारताने घरच्या आणि विदेशी मैदानावर टी20 सामने जिंकण्याचा सपाटाच लावला होता. त्यातच पाकिस्तानची गोलंदाजीही किती खतरनाक याच्याबाबतही तर्कवितर्क लावले जात होते. त्यातच त्यांचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाची मैदाने कशी गाजवतील अशा चर्चा रंगात आल्या होत्या, मात्र स्पर्धेत काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. भारताचा माजी अष्टपैलू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने ट्विट करत भारत किंवा पाकिस्तान या टी20 विश्वचषकात का जिंकला नाही? याचे उत्तर दिले आहे.
कैफने ट्विट करत म्हटले, ‘ या विश्वचषकातून मिळालेला धडा- पाकिस्तान केवळ गोलंदाजीने, भारत केवळ फलंदाजीने विश्वचषक जिंकू नाही शकत. इंग्लंडकडे फलंदाज, स्पिनर्स, वेगवान गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि नशीब आहे.’ कैफचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी झाली होती. तो सामना भारताने 10 विकेट्सने गमावला होता. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात नाणेफेक इंग्लंडच्याच बाजूने राहिली आणि त्यांनी लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला.
Lesson from this World T20: Pakistan can't win Cup by just bowling, India can't win Cup by just batting. England has batters, spinners, pacers, fielders, and luck
— Mohammad Kaif (@MohammadKaif) November 13, 2022
भारताविरुद्ध इंग्लंडने 170 धावांचे लक्ष्य गाठताना एकही विकेट गमावली नाही आणि अंतिम सामन्यात धडाक्यात प्रवेश केला. पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांना 138 धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य पार करताना त्यांना चांगलाच गाम गाळावा लागला असला तरी त्यांनी एक षटक आणि 5 विकेट्स शिल्लक राखत सामना जिंकला. दोन टी20 विश्वचषक जिंकणारा इंग्लंड वेस्ट इंडिज पाठोपाठ दुसरा संघ ठरला. Mohammad Kaif tweet on India Batting And Pakistan Bowling
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या दिग्गजाचे भारताच्या कॅप्टनबाबत कडवे बोल; म्हणाले, ‘या विश्वचषकात ओएन मॉर्गनचे योगदान रोहित शर्मापेक्षा…’
हरभजनने ‘या’ खेळाडूला ठरवले पाकिस्तानच्या पराभवास जबाबदार; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच संघ अडचणीत