Loading...

…आणि नबी म्हणाला मी अजून जिवंत आहे

शुक्रवारी (4 ऑक्टोबर ) अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीचे निधन झाल्याच्या  अफवा सोशल मिडीयावर पसरल्या होत्या. त्यामुळे अफगाणिस्तानचे चाहते ही अफवा ऐकून आश्चर्यचकीत झाले होते.

Loading...

शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने नबीचा मृत्यू झाल्याच्या अफवा वेगाने पसरल्या होत्या. या अफवा पसरत असताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) मिस-ए ऐनक नाइट्स आणि बोस्ट डिफेंडर्समधील सराव सामन्याचे फोटोही ट्विटरवर शेअर केले होते आणि विशेष म्हणजे या फोटोमध्ये नबीही खेळताना दिसत होता. परंतू तरीही अफवा तशाच दिवसभर पसरत राहिल्या.

Loading...

अखेर, नबीने स्वत:च त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले.

त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की “प्रिय मित्रांनो, सुदैवाने मी ठीक आहे, मी मरण पावल्याच्या काही अफवा पसरवल्या जात आहेत, त्या खोट्या आहेत. धन्यवाद.”

34 वर्षीय नबी हा अफगाणिस्तानच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक असून त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 3 कसोटी, 121 वनडे आणि 72 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 4023 धावा केल्या आहेत आणि 205 विकेट्स घेतल्या आहेत.

Loading...
You might also like