---Advertisement---

हा खेळाडू होऊ शकतो पाकिस्तानचा नवा कर्णधार, PCB लवकरच घेणार मोठा निर्णय!

Mohammad Rizwan and Babar Azam
---Advertisement---

मोहम्मद रिझवानची पाकिस्तानच्या वनडे आणि टी20 संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, रिझवान आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी यांची भेट झाली होती. त्यानंतर लवकरच रिझवानला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. निवडकर्त्यांना रिझवानला कर्णधार बनवण्याचा पर्याय निवडला, तर सलमान अली आगा लवकरच संघाचा उपकर्णधार म्हणून निश्चित केला जाऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनाही रिझवानला कर्णधार बनवण्याचा निर्णय आवडला. संघात नव्या खेळाडूंच्या आगमनाचा निकालावर सकारात्मक परिणाम झाला आहे. असे त्याचे मत आहे. आगामी ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी पीसीबीने संघाला मंजुरी दिली असून लवकरच संघाची घोषणा केली जाऊ शकते. असेही बातमी आहे. चॅम्पियन्स एकदिवसीय चषक स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे संघाची निवड करण्यात आली आहे.

वृत्तानुसार, मोहम्मद रिझवानचे नाव मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी त्याला कर्णधार बनवण्यासाठी पुढे केले होते. काही आठवड्यांपूर्वीच बाबर आझमने पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. कारण त्याला त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. यासोबतच कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या इच्छेचे कारण देत त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

मोहम्मद रिझवानलाही कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे. त्याने पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये मुलतान सुलतान्सचे नेतृत्वही केले आहे. त्याला 2021 मध्ये सुलतानचे कर्णधारपद देण्यात आले आणि त्याच हंगामात या संघाने अंतिम फेरीत पेशावर झल्मीचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा-

’12 वर्षातून एकदा घडते…’- पराभवानंतर रोहित शर्माचे बेताल वक्तव्य; चाहत्यांनी फटकारले
कर्णधार रोहितच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, घरच्या मैदानावर कसोटी गमावण्यात धोनीलाही टाकले मागे
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---