---Advertisement---

‘हो तो घाबरतोय’, फलंदाजी करत असलेल्या गेलची पाकिस्तानी गोलंदाज अन् यष्टीरक्षकाने उडवली खिल्ली

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 11:04 AM
---Advertisement---

सोमवारी (१८ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सराव सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिज संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. हा सामना सुरू असताना ख्रिस गेल ज्यावेळी फलंदाजी करत होता, त्यावेळी यष्टिरक्षक आणि गोलंदाजामध्ये झालेल्या मजेशीर संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये बरेच मोठमोठे विक्रम केले आहेत. परंतु सध्या त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. आयपीएल स्पर्धेत देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या गोलंदाजाने आणि यष्टिरक्षकाने त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.

या व्हिडिओमध्ये जेव्हा ख्रिस गेल फलंदाजीला येतो, त्यावेळी ९ वे षटक टाकण्यासाठी शादाब खान गोलंदाजीला येतो. या षटकातील ५ वा चेंडू टाकण्यापूर्वी शादाब खान यष्टिरक्षक मोहम्मद रिजवानला म्हणतोय की, “गेल दबावात फलंदाजी करतोय.” ज्यावर प्रतिसाद देत मोहम्मद रिजवान म्हणतो, “हा तो घाबरतोय.” व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही गोलंदाज आणि यष्टीरक्षकाचा व्हायरल होत असलेला संवाद स्पष्टपणे ऐकू शकता.(Mohammad Rizwan says Chris Gayle is under pressure and bit scared during warm up game)

पाकिस्तान संघाचा ७ गडी राखून विजय
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिमरोन हेटमायरने वेस्ट इंडिज संघाकडून सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तर कायरोन पोलार्डला २३ धावा करता आल्या. तसेच ख्रिस गेल अवघ्या २० धावा करत माघारी परतला. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला २० षटक अखेर ७ बाद १३० धावा करण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १६ व्या षटकातच त्यांचे लक्ष्य साध्य केले.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकातील गेलचा ‘हा’ विक्रम मोडणे अशक्य, विस्फोटक फलंदाज रोहित-ब्रावोलाही नाही जमणार

टी२० विश्वचषकासाठी पार्थिवने निवडला भारताचा सर्वोत्कृष्ट संघ, खराब फॉर्मातील ‘या’ फिरकीपटूवर लावला डाव

‘अश्विन भाई.. हीच संधी आहे, लेग स्पिन टाकून घे’, लाईव्ह सामन्यात पंतचा गमतीशीर संवाद स्टंप माइकमध्ये कैद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---