---Advertisement---

हे भारीयं! दरवेळी विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमी विराट कोहलीला विचारतो ‘हा’ महत्त्वाचा प्रश्न

On: बुधवार, मे 19, 2021 7:47 PM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही वर्षापासून सातत्याने दमदार कामगिरी करतो आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. विशेषतः विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली त्याची कामगिरी अधिकच बहरल्याचे दिसून आले आहे. कोहली कायमच त्याच्या गोलंदाजांना प्रोत्साहन आणि स्वातंत्र्य देताना दिसून आला आहे. याच कारणाने गोलंदाज देखील त्याच्या नेतृत्वाखाली मोकळेपणाने खेळताना दिसून येतात. मोहम्मद शमीने आता कोहली बद्दल अशीच अजून एक खास आणि गमतीदार गोष्ट सांगितली आहे.

विकेट घेतल्यावर शमी कोहलीला विचारतो प्रश्न
आपण नेहमीच पाहिले आहे की विराट कोहली कुठल्याही गोलंदाजाने विकेट घेतल्यावर जोरदार सेलिब्रेशन करत असतो. कित्येकदा तर ज्या गोलंदाजाने विकेट घेतली आहे, त्यापेक्षा अधिक उत्साहाने कोहली सेलिब्रेशन करत असल्याचे आपल्याला दिसून येते. कोहलीच्या याच गमतीदार गोष्टीबद्दल मोहम्मद शमीने खुलासा केला आहे.

मोहम्मद शमी म्हणाला, “कोहली अनेकदा मैदानावर विकेट घेतल्यावर अतिशय उत्साहात सेलिब्रेशन करतो. कधी कधी तो मला म्हणतो की विकेट घेऊन पण तू फारसा खुश झाल्याचे दिसत नाही आहे. त्यावर मी त्याला विचारतो की माझ्या वाट्याचे सेलिब्रेशन तर तूच केले, नाही का? कोहली ज्यावेळी सेलिब्रेशन करतो, त्यावेळी तो स्वतः तर उत्साहात असतोच, त्याचवेळी संघ सहकार्‍यांना देखील त्यात सामील करून घेतो.”

यावेळी शमीने कोहलीच्या नेतृत्वाचे देखील भरभरून कौतुक केले. तो म्हणाला, “कोहली अशाप्रकारे अतिशय उत्साहाने सेलिब्रेशन करत असला तरी ते वातावरण मैदानावर निर्माण होणे गरजेचे असते. कोहली अनेकदा आपला राग देखील मैदानावर उघडपणे व्यक्त करत असतो. एकूणच मैदानावर त्याला आपल्या भावना मोकळेपणाने प्रदर्शित करायला आवडते. मात्र त्याने गेल्या काही वर्षांत अतिशय जबरदस्त पद्धतीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तो एक शानदार फलंदाज आहे.”

हेही वाचा- 

विराटला नावे ठेवण्याआधी त्याने केलेले हे  काम नक्की पाहा, पाहा आता कुणाच्या आलाय मदतीला

विराट, एबी, मॅक्सवेलला ७ चेंडूत बाद करणाऱ्या त्या युवा गोलंदाजाने सांगितला सामन्याआधीचा रितसर प्लॅन

सेहवाग बनला कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन दूत, प्रसिद्ध केला हेल्पलाईन नंबर

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---