---Advertisement---

मोहम्मद शमीने इंग्रजांना लोळवले, ३ विकेट्स घेत आजवर कोणत्याही भारतीयाला न जमलेले काम केले

On: मंगळवार, जुलै 12, 2022 10:23 PM
Mohammad-Shami
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात केनिंग्टन ओव्हल येथे मंगळवारी (१२ जुलै) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले आणि संघाला १० विकेट्सने सामना जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना एकाहून एक खतरनाक चेंडू टाकत २६ षटकातच संघाचा डाव संपवला. यादरम्यान शमीने ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे.

शमी (Mohammad Shami) आणि बुमराहने (Jasprit Bumrah) पावरप्लेमध्ये धारदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ओढले. बुमराहने ६ आणि शमीने इंग्लंडच्या ३ विकेट्स घेतल्या. ७ षटके फेकताना ३१ धावा देत त्याने या विकेट्स काढल्या.

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज बेन स्टोक्सला त्याने शून्यावर झेलबाद केले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर हादेखील त्याच्या जाळ्यात फसला. त्याने बटलरला (३० धावा) सूर्यकुमार यादवच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर खालच्या फळीतील क्रेग ओव्हरटन हा त्याची तिसरी विकेट ठरला. अशाप्रकारे या ३ विकेट्स घेत त्याने वनडे कारकिर्दीतील १५० विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे.

यासह तो वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज बनला आहे. इंग्लंडविरुद्धचा हा सामना त्याचा ८०वा वनडे सामना होता. एकूण आकडेवारी पाहायची झाल्यास, बुमराह वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानची बरोबरी केली आहे. मिचेल स्टार्क या यादीत अव्वलस्थानी आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स (सामन्यांनुसार) (Fastest 150 ODI Wickets):
७७ सामने- मिचेल स्टार्क
७८ सामने- सकलेन मुश्ताक
८० सामने- राशिद खान
८० सामने- मोहम्मद शमी*
८१ सामने- ट्रेंट बोल्ट
८२ सामने- ब्रेट ली

जसप्रीत बुमराहचीही विक्रमी कामगिरी
फक्त शमीनेच नव्हे तर, बुमराहनेही दणकेबाज गोलंदाजी करत संघाच्या विजयात हातभार लावला. त्याने केवळ १९ धावा खर्च करत इंग्लंडच्या ६ फलंदाजांना बाद केले. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शनही ठरले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बुमराह आला, विषय संपला! इंग्लंडच्या ६ विकेट्स घेत दिग्गजांच्या यादीत सामील, नेहराला सोडले मागे

भारताने घेतलीये विश्वविजेत्यांची मज्जा! पहिल्या वनडेत हवेत उडणाऱ्या इंग्लंडला आदळलंय जमिनीवर

‘मला विश्वचषक खेळायचा आहे, त्यामुळे…’, भारतीय संघात परतल्यानंतर शिखर धवनचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---