विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाचा फलंदाजी क्रम उध्वस्त करण्यात काइल जेमिसनने महत्वाची भूमिका बजावली होती.त्याने अवघ्या ३१ धावा खर्च करत सर्वाधिक ५ गडी बाद केले. तसेच या डावात त्याला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी होती. परंतु मोहम्मद शमी मुळे त्याला हा विक्रम करता आला नाही.
काइल जेमिसनने या डावात आपल्या स्विंग आणि वेगवान गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले होते. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा यांना बाद केले होते. या दरम्यान त्याला हॅटट्रिक करण्याचीही संधी मिळाली होती. परंतु मोहम्मद शमीमुळे त्याला हॅटट्रिक पूर्ण करता आली नाही. (Mohammad shami broke jamieson’s dream dream of taking a hattrick in WTC final by playing cover drive)
शमी मुळे काइल जेमिसन हा मोठा विक्रम करण्यापासून राहिला वंचित
तर झाले असे की, भारतीय संघ फलंदाजी करत असताना ९२ वे षटक काइल जेमिसन टाकत होता. याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने ईशांत शर्माला माघारी धाडले तर पाचव्या चेंडूवर त्याने जसप्रीत बुमराहला बाद केले होते. पुढील चेंडूवर मोहम्मद शमीला बाद करून त्याच्याकडे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅट्रिक घेण्याची संधी होती. परंतु मोहम्मद शमीने शेवटच्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह खेळत चौकार लगावला. त्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसून आले होते. आयसीसीनेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर दोघांचा हसत असतानाचा फोटो शेअर केला आहे.
Plenty of wickets on the third day of the ICC World Test Championship Final, but in between all that was some gorgeous batting, and a few emotions.
Your @OPPOIndia Batting Highlights for the day 👇 pic.twitter.com/5eoR8pky0x
— ICC (@ICC) June 20, 2021
https://youtu.be/lAsSTn_jcNU
भारतीय संघाला २१७ धावा करण्यात आले यश
भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ६२ धावांची भागीदारी केली होती. यामध्ये रोहित शर्माने ३४ धावांचे योगदान दिले तर शुबमन गिल २८ धावा करत माघारी परतला होता. या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावा करण्यात यश आले.
न्यूझीलंड संघ मजबूत स्थितीत
डेवोन कॉनवे आणि टॉम लेथम यांनी या सामन्यात देखील न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ३० षटक फलंदाजी केली. त्यानंतर लेथम ३० धावा करत माघारी परतला. तर चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या डेवोन कॉनवेने या सामन्यात देखील अर्धशतक झळकावले.परंतु त्याला मोठी खेळण्यास अपयश आले. तो ५४ धावा करत माघारी परतला. तसेच न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन नाबाद १२ धावांवर फलंदाजी करत आहे. तर रॉस टेलर नाबाद ० धावांवर फलंदाजी करत आहे. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड संघाला २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“गांगुली मला संघात घेण्यास इच्छुक नव्हता” भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा
‘केरळ एक्सप्रेस’ आता आपल्या अभिनयाने घेणार विकेट्स, झळकणार बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमात
WTC Final, INDvsNZ Live: संपूर्ण चौथ्या दिवसावर पावसाचे सावट; खेळ सुरु होण्यास उशीर