---Advertisement---

अखेर अनैतिक संबंधाच्या आरोपांवर मोहम्मद शमीने दिली प्रतिक्रिया

On: बुधवार, मार्च 7, 2018 2:24 PM
---Advertisement---

मुंबई : भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या त्याच्यावरील गंभीर आरोपांचे खंडन केले आहे. त्याची पत्नी हसीनजहांने त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप केले आहेत. 

‘मी मोहम्मद शमी, माझ्याबद्दल आणि परिवाराच्या खासगी आयुष्याबाबत ज्या बातम्या येत आहेत त्या सर्व खोट्या आहेत. माझ्याविरुद्ध हा खूप मोठा कट आहे. मला बदनाम करण्यासाठी आणि माझा खेळ खराब करण्याचा हा प्रयत्न आहे.’ असे शमी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतो. 

 

काय आहे हे प्रकरण:

शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप, शमीचे तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा फेसबूकवर आरोप

मुंबई : भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप केले आहेत. तिने हे आरोप करताना फेसबुकवर ७ ते ८ पोस्ट लिहील्या आहेत. 

मोहम्मद शमीच्या पत्नीचे नाव हसीनजहां असे असून तिने शमीच्या फेसबुक आणि वाॅट्सअॅप चटींगचेही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 

यात तिने काही महिलांचे सरळ मोबाईल क्रमांक देत तर काही तरुणींसोबतचे शमीचे फोटो शेअर करत पोस्ट लिहील्या आहेत. 

या सर्व पोस्ट मंगळवारी केल्या असून यातील बहुतेक पोस्ट बुधवारी डिलीट करण्यात आल्या आहेत. 

मोहम्मद शमी सध्या इंडीया ‘अ’ कडून खेळत असुन देवधर ट्राॅफीचे हे सामने धरमशाला येथे सुरू आहेत. त्याने भारताकडून ३० कसोटी, ५० वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. 

असे असले तरी काल मात्र  शमीच्या फेसबुक पेजवर मात्र एक लेख शेअर करण्यात आला असून ज्यात त्याने विराट कोहलीचे कर्णधार म्हणून कौतुक केलेले दिसते. 

२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने २०१४ मध्ये लग्न केले होते. २४ जानेवारी २०१८ रोजी तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.

https://twitter.com/Khiladi_desi/status/971239229593440257

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment