दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२७ धावांचा डोंगर उभारला. तर गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिका संघाचा डाव १९७ धावांवर गुंडळला. यासह भारतीय संघाने दुसऱ्या डावात मोठ आघाडी घेतली आहे. आता शेवटच्या २ दिवसात भारतीय संघाची प्लॅनिंग काय असणार आहे? याचा खुलासा स्वतः मोहम्मद शमीने (mohammad shami) केला आहे.
शमीने तिसऱ्या दिवसाच्या (२८ डिसेंबर) समाप्तीनंतर म्हटले की, “कसोटी सामन्यात दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मला असे वाटते की, आम्ही जितकं जास्त होईल तितका वेळ फलंदाजी केली पाहिजे. जर आम्ही २५० धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिका संघाला ४०० धावांचे आव्हान दिले, तर आम्ही दक्षिण आफ्रिका संघाला ४ सत्र फलंदाजी करण्याची संधी देऊ शकतो. परंतु त्यासाठी आम्हाला कमीत कमी ३५० किंवा ४०० धावांची आवश्यकता आहे.”(Mohammad shami revealed the plan of indian team for last two days)
तसेच या सामन्यात जर भारतीय संघाने ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे लक्ष्य दिले. तर, भारतीय संघाचा विजय निश्चित आहे. कारण सेंच्युरियनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाचा सर्वोत्तम पाठलाग २२६ धावांचा आहे. जो १९९८ मध्ये केला होता. या मैदानावर सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने बाजी मारली आहे.
दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) पाऊस पडल्यामुळे खेळ रद्द करण्यात आला होता. पावसाचा फायदा वेगवान गोलंदाजांना झाला, ज्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवशी १८ गडी बाद २६८ धावा झाल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला १९७ धावा करण्यात यश आले. यासह भारतीय संघाने १४६ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
इंग्लंडचे पानिपत करणाऱ्या बोलँडला भारतीय फलंदाजांनी दाखवलेले दिवसा तारे; वाचा ‘त्या’ मालिकेविषयी
बिग बॅशचे मैदान गाजवणारा बेन मॅकडरमॉट आहे तरी कोण? घ्या जाणून
हे नक्की पाहा: