---Advertisement---

ऑन माय वे! भारतीय संघाचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम; वनडे मालिकेत करु शकतो पुनरागमन

On: बुधवार, मार्च 3, 2021 11:58 PM
---Advertisement---

बंगळुरु। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेला भारताचे काही प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे मुकले आहेत. यात रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार अशा खेळाडूंचा समावेश आहे. पण आता भारतीय संघासाठी चांगली बातमी म्हणजे या तिघांनीही क्रिकेट सरावाला सुरुवात केली असून, भुवनेश्वर कुमार तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आहे. तसेच जडेजा आणि शमीही सरावाला लागले आहेत.

शमीने नुकताच बुधवारी (३ मार्च) त्याचा बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील नेटमध्ये सराव करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तो त्याचा रनअप पूर्ण करुन नेटमध्ये असणाऱ्या फलंदाजाला वेगवान चेंडू टाकताना दिसत आहे. या व्हिडिओंच्या पोस्टला शमीने कॅप्शन दिले आहे की ‘मी १०० टक्के माझ्या मार्गावर आहे.”

https://www.instagram.com/p/CL8g3MIlGeq/

वनडे मालिकेतून करु शकतो पुनरागमन

मोहम्मद शमीने जर त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली, तर त्याला इंग्लंडविरुद्ध २३ मार्चपासून पुण्यात सुरु होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळू शकते. सध्या त्याला दुखापतीतून सावरत असल्याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेला मुकावे लागणार आहे.

त्याचबरोबर सध्या माध्यमांमध्ये अशीही चर्चा आहे की भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला टी२० पाठोपाठ वनडे मालिकेसाठीही विश्रांती देण्यात येऊ शकते. जर असे झाले तर कदाचीत शमीचे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये प्रमुख आणि अनुभवी गोलंदाज म्हणून पुनरागमन होऊ शकते. त्यामुळे आता शमी नक्की कधी पुनरागमन करतो हे पाहावे लागले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाली होती दुखापत 

मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या मनगटाला ऍडलेड येथे कसोटी सामना खेळताना दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पॅट कमिन्सचा चेंडू हाताला लागला होता. त्यामुळे त्याचे मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतला होता.

शमीची कारकिर्द –

मोहम्मद शमीने आत्तापर्यंत ५० कसोटी सामने खेळले असून यात त्याने १८० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ७९ वनडे सामने खेळले असून १४८ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने १२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

वॉनचे टिकास्त्र थांबेना! आता ‘हा’ व्हिडिओ शेअर करत साधला अहमदाबादच्या खेळपट्टीवर निशाणा

चौथा कसोटी सामना भारत, इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूंसाठी ठरु शकतो खास, मोठे विक्रम करण्याची संधी

साल १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे ‘मार्टिन क्रो’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---