वनडे विश्वचषक 2023 मधील पहिला उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियम येथे खेळला गेला. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात समोरासमोर आले. या सामन्यात भारतीय संघाने 397 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने चांगला संघर्ष केला. मात्र, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी संघाला पुनरागमन करून देत न्यूझीलंडचे वरील फळीतील चारही फलंदाज बाद केले. यासोबतच त्याने वनडे विश्वचषकात एक मोठा पराक्रम ही केला.
5️⃣0️⃣ CWC Wickets & counting ⚡⚡
Spectacular Shami 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/yh8963Yhn3…#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/EU1YJ61L7a
— BCCI (@BCCI) November 15, 2023
शमी याने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर बाद करत भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन व डॅरिल मिचेल यांनी दीड शतकी भागीदारी करत न्यूझीलंडला पुनरागमन करून दिले. मात्र आपल्या पुढील स्पेलमध्ये आल्यानंतर शमीने केन व टॉम लॅथम यांना बाद केले.
केन याला बाद करतात त्याच्या नावे या विश्वचषकात 20 बळी जमा झाले. तसेच वनडे विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात वेगवान 50 बळी घेण्याचा विश्वविक्रमही त्याने केला. वनडे विश्वचषकात 50 बळी मिळवणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने केवळ 17 सामन्यात ही कामगिरी करून दाखवली. त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क याचा विक्रम मोडीत काढला. स्टार्कने 19 सामन्यात 50 बळी मिळवले होते. तर लसिथ मलिंगा याने 22 सामन्यात हा पल्ला गाठला होता.
(Mohammad Shami Took 50 Wickets In ODI World Cup Become Fastest In History)
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Semi Final: गिलने अर्धशतक ठोकताच गगनात मावेनासा झाला आई-वडिलांचा आनंद