भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर सुरू आहे. गुरुवारी (9 फेब्रुवारी) बॉर्डर गावसकर ट्रॉफीची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात नाणेफेक पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकली. पण त्यांच्या संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियन संघ भारतीय खेळपट्टीविषयी तक्रार करत होता. याठिकाणच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजीसाठी अधिक अनुकूल असल्याचे ऑस्ट्रेलियाकडून बोलले जात होते. पण मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि मोसम्मद शमी (Mohammad Shami) या भारतीय वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर अगदी सहजरित्या गोलंदाजी करत पहिल्या दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियान सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) प्रत्येकी एक-एक धाव करून तंबूत परतले.
ऑस्ट्रेलियाला पहिला झटका उस्मान ख्वाजाच्या रूपात बसला. डावातील दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराज त्याचा पहिला चेंडू टाकण्यासाठी आला. सामन्यातील त्याच्या पहिल्याच चेंडूवर सिराजला मोठे यश मिळाले आणि त्याने उस्मान ख्वाजाला पायचीत पकडले. चेंडून फलंदाजाच्या पायाला लागल्यानंतर सिराजने विकेटसाठी अपील केली, पण पंचांनी त्याला दाद दिली नाही. त्यानंतर कर्णधार रोहितने सिराजसोबत चर्चा करून डिआरएसचा निर्णय घेतला, जो अचूक ठरला. डिआरएसमध्ये चेंडू स्टंप्समध्ये जाताना दिसल्यानंतर पंचांनी स्वतःचा निर्णय बदलला आणि ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावली.
𝑰. 𝑪. 𝒀. 𝑴. 𝑰!
1⃣ wicket for @mdsirajofficial 👌
1⃣ wicket for @MdShami11 👍Relive #TeamIndia's early strikes with the ball 🎥 🔽 #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/K5kkNkqa7U
— BCCI (@BCCI) February 9, 2023
सिराजपाठोपाठ मोहम्मद शमीने डावातील तिसऱ्या आणि त्याच्या दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका दिला. यावेळी सलामीवीर डेविड वॉर्नर भारतीय तोफखाण्याचा शिकार बनला. शमीने तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर वॉर्नरला त्रिफलाचीत केले. सिराजने टाकलेला हा चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर थेट स्टंप्समध्ये घुसला. या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून शमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Mohammad Siraj and Mohammad Shami dismissed the Australian openers with one run each)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी रेटिंगमध्ये शुबमन गिलची मोठी झेप, हार्दिक लवकरच बनणार सर्वोत्तम अष्टपैलू
समोर आले वॉर्नच्या शेकडो करोडोंच्या संपत्तीचे वाटपपत्र! पत्नी-गर्लफ्रेंड बेदखल, सर्व मुलांना दिला हक्क