---Advertisement---

मोहम्मद सिराज-ट्रॅव्हिस हेड यांच्यावर बंदी? दोघांमधील जोरदार वादानंतर आयसीसी उचलणार मोठं पाऊल

---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड ॲडलेडमधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या जोरदार भांडणानंतर आयसीसीच्या चौकशीत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 82 व्या षटकात सिराजने हेडला बाद करण्यासाठी एक शानदार इन-स्विंग यॉर्कर टाकल्यावर ही घटना घडली. विकेटनंतर, सिराजने आक्रमकपणे स्टँडकडे बोट दाखवत हेडला जल्लोषपूर्ण सेलिब्रेशन केला. प्रत्युत्तरात, हेडने सिराजला काहीतरी बोलला आणि नंतर घरच्या प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात मैदानातून निघून गेला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिराज आणि हेड या दोघांना मैदानावरील संघर्षासाठी शिस्तभंगाच्या सुनावणीला सामोरे जावे लागू शकते. तथापि, त्यांच्यावर बंदी घालण्याची शक्यता नाही. कारण अशा घटनांना सहसा हलकी शिक्षा दिली जाते.

या मुद्द्यावर दोन्ही खेळाडूंनी आपले मत सर्वांसमोर मांडले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत हेड म्हणाला, “खरेतर मी गंमतीने ‘चांगली गोलंदाजी केला’ म्हणालो पण त्याने दुसरे काहीतरी ऐकले आणि मला स्लेज केले. त्यावर मीही प्रतिक्रिया दिली पण मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही.”

मात्र मोहम्मद सिराज यांनी ट्रॅव्हिस हेडचे हे विधान खोटे असल्याचे म्हटले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी मोहम्मद सिराजने स्टार सपोर्टवर हरभजन सिंगशी बोलताना सांगितले की, “मी फक्त सेलिब्रेट केलो त्याशिवा मी काहीही बोललो नाही. पण पत्रकार परिषदेत तो काही बोलला ते खोटे आहे. आम्ही सर्वांचा आदर करतो. मी सर्वांचा आदर करतो कारण क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. पण त्याची पद्धत चुकीची होती आणि मला ती आवडली नाही”.

हेही वाचा-

IND vs AUS: मोहम्मद सिराजच्या ‘त्या’ कृतीवर रोहित शर्माची साथ, म्हणाला “कर्णधार म्हणून पाठिंबा देणे….”
IND vs AUS: टीम इंडियाला आणखी एक धक्का, रोहित शर्माच्या या वक्तव्याने मोठी खळबळ
WTC 2025 फायनलच्या शर्यतीत हे चार संघ, जाणून घ्या भारतासह सर्व देशांचे समीकरण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---