आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमनेसामने आले. मोहली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी व गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विराट कोहली व फास्ट डू प्लेसिस यांच्या अर्धशतकांमुळे आरसीबीने 174 धावा धावफलकावर लावल्या. या धावांचा बचाव करण्यासाठी उतरल्यानंतर आरसीबीचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने पॉवर प्लेमध्ये घातक गोलंदाजी करताना आपल्या नावे नवा पराक्रम नोंद केला.
आरसीबीने विराज व प्लेसिस यांच्या अर्धशतकांमुळे 5 बाद 174 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. गोलंदाजीची संधी आल्यानंतर संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा नेहमीप्रमाणे मदतीला धावून आला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर अथर्व तायडे याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर धोकादायक लियाम लिविंगस्टोन याला पाहिजेत करत मोठे यश मिळवले. पावर प्लेमध्ये त्याने दोन षटके टाकताना 14 धावा देत दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. तसेच एका फलंदाजाला धावबाद करण्यात येईल त्याची फेक कामी आली.
सिराज आयपीएल 2023 मध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना भलताच घातक दिसत आहे. त्याने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये पॉवर प्ले दरम्यान 14 षटके टाकताना 6 बळी टिपले. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 4.21 इतका कमी राहिला आहे. त्याने टाकलेल्या 84 पैकी 57 चेंडू निर्धाव राहिले आहेत. विशेष म्हणजे तो सातत्याने पहिल्या षटकात बळी मिळवण्यात यशस्वी ठरतोय.
आरसीबीने या सामन्यात पॉवर प्लेमध्ये दमदार खेळ दाखवला. सिराजने दोन, हसरंगाने एक व धावबादच्या रूपाने एक बळी मिळवत पंजाबची हालत 4 बाद 49 झाली होती.
(Mohammad Siraj Bowl Furious Spell Again In Power Play In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये ‘या’ संघांनी नवीन कर्णधार नेमून केली मोठी चूक! पाहा आकडेवारी
कॅप्टन्सी सोडल्यानंतर 566 दिवसांनी विराट पुन्हा बनला कर्णधार, ‘या’ कारणामुळे सांभाळली संघाची धुरा