---Advertisement---

देशावरचं निस्सीम प्रेम! हाताला जखम झाली, रक्त वाहिलं, तरीही सिराजने षटक पूर्ण करत १ विकेटही घेतली

---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. बुधवारी (१७ ऑक्टोबर) भारताचा नवा टी-२० कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १६४ धावा केल्या. भारतीय संघाने पाच गडी राखून सामना सहज जिंकला. सामन्याच्या पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज जखमी झाला. यानंतरही त्याने आपले षटक पूर्ण केले आणि एक विकेटही घेतली. त्याच्या या कामगिरीचे क्रिकेट चाहत्यांनी कौतुक केले आहे.

भारताकडून विसाव्या षटकासाठी आलेल्या मोहम्मद सिराजचा पहिला चेंडू फुल लेंथ होता. स्ट्राईकवर असलेल्या सॅन्टनरने तो फटका समोर खेळला. सिराजने डाव्या हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या वेगामुळे तो जोरात सिराजच्या हाताला लागला आणि त्याच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागला. यानंतरही सिराजने आपले षटक पूर्ण केले. या षटकातील पाचव्या चेंडूवर सिराजने रचिन रवींद्रची विकेटही घेतली. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला केवळ ७ धावा करता आल्या.

तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते. न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६४ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिलने सर्वाधिक ७० धावा केल्या तर मार्क चॅपमनने ६३ धावांचे योगदान दिले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी २-२ तर दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावा केल्या. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. रोहितने ४८ धावांचे योगदान दिले. डॅरिल मिशेलच्या डावातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिषभ पंतने चौकार मारून भारताला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. तो १७ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १७ धावा करून नाबाद परतला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्डने ३१ धावांत २ बळी घेतले, तर टीम साऊदी, मिचेल सँटनर आणि डॅरिल मिशेलने १-१ बळी घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडच्या वर्ल्डकप हिरोला झिरो ठरवत भुवीने केली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विकेट्सची फिप्टी

बटलरला भोवली पंतची निर्भीड फलंदाजी; म्हणाला, ‘मीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अशीच दाणादण उडवेन’

रोहितने आत्तापर्यंत १९ टी२० सामन्यात केलं आहे भारतीय संघाचे नेतृत्व, वाचा त्याचे जय-पराजयाचे रिकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---