---Advertisement---

“माझ्या सुपर हिरोसाठी…”, विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर सिराज भावुक

On: मंगळवार, जानेवारी 18, 2022 5:00 PM
Mohammed Siraj and Virat Kohli
---Advertisement---

येत्या १९ जानेवारी पासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच विराट कोहली याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तब्बल ७ वर्ष कसोटी संघाची जबाबदारी पार पाडल्यानंतर अखेर त्याने कर्णधारपद सोडले आहे. संघाचे नेतृत्व करत असताना त्याने अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवली. त्यापैकीच एक नवे म्हणजे मोहम्मद सिराज. विराटने कर्णधार पदावरून पायउतार केल्यानंतर अनेकांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या इंस्टाग्राम (Mohammad Siraj instagram post) अकाऊंटवर मंगळवारी (१८ जानेवारी) एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने विराट कोहली सोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये कॅप्शन म्हणून त्याने, “माझ्या सुपर हिरोसाठी… मला तुझ्याकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभार मानने पुरेसे नाही. तू नेहमीच माझ्यासाठी एका मोठ्या भावासारखा राहिला आहेस. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी आभार.. किंग कोहली तू नेहमीच माझा कर्णधार राहशील.” असे लिहिले आहे.

मोहम्मद सिरजने २०१७ मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. हा सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध राजकोटच्या मैदानावर पार पडला होता. त्यानंतर त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले.

https://www.instagram.com/p/CY17R6drRWg/?utm_medium=copy_link

तसेच २०२० मध्ये त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. याच वर्षी त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या संधीचा पुरेपूर लाभ घेत त्याने भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. आता सध्या तो भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. अवघ्या १२ कसोटी सामने खेळणाऱ्या या खेळाडूला १०० कसोटी सामने खेळलेल्या ईशांत शर्माच्या जागी संघात स्थान दिले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

आयपीएल २०२२: अहमदाबादने निवडली आपली ‘त्रिमूर्ती’; हार्दिक-राशिदसह ‘या’ युवा फलंदाजावर लावला दाव

बुमराहसोबतच्या ‘हायव्होल्टेज’ वादानंतर आली जेन्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…

हे नक्की पाहा : 

क्रिकेटर्सलाही मागे सोडत 'हे' अंपायर कमावतात चिक्कार पैसा | Richest Umpires

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---