न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने 3 सामन्यांची टी20 मालिका 1-0ने खिशात घातली. मात्र, या मालिकेतील फक्त एकच सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय पार पडला. हा मालिकेतील दुसरा सामना होता. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तसेच, तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा पूर्ण डाव खेळला गेला, परंतु भारतीय संघ 9 षटकेच खेळू शकला. हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला. यासह भारताने मालिकाही नावावर केली. मालिकेतील अखेरच्या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराज याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र, माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा याने तरीदेखील त्याच्यावर टीका केली आहे.
तिसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 4 बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यानंतर आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाले,
“सिराजने या मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याची गोलंदाजी खरंतर या मालिकेतील भारतीय संघाची जमेची बाजू म्हणता येईल. तो टी20 चा सर्वोत्तम गोलंदाज नाही. कारण त्याची गोलंदाजी हीट द डेक आहे. ज्यावेळी आयपीएलमध्ये तुम्ही चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत असता तेव्हा महागडे ठरण्याची शक्यता असतेच. आता हळूहळू तो परिपक्व होताना दिसतोय. त्याच्यातील सुधारणा नक्कीच कौतुकास्पद वाटते.”
मोहम्मद सिराज हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी खेळतो. यादरम्यान त्याची गोलंदाजी काहीशी महागडी ठरते. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो शानदार गोलंदाजी करताना दिसला. त्यामुळे भविष्यात तो भारतीय गोलंदाजीचा एक प्रमुख भाग असेल असे म्हटले जात आहे.
(Mohammad Siraj Not Best T20 Bowler Aakash Chopra Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जस्टीन लॅंगर यांचा पॅट कमिन्सवर हल्लाबोल; म्हणाले, ‘तो भित्रा असून माझ्यासमोर वेगळा वागत होता!’
वेंकटेश अय्यरचा खुलासा; म्हणाला, ‘त्यामुळे रोहित शर्मा गोलंदाजीची संधी देत नाही’