भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अमेरिकेविरुद्ध अविश्वसनीय झेल घेतला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या चेंडूवर सिराजने नितीशकुमारला बाऊंड्रीजवळ झेलबाद केले. हवेत उडी मारत त्याने शानदार झेल झेलला. हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा होता. यजमान अमेरिकेला हरवून टीम इंडिया टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये पोहोचेला.
अर्शदीप सिंगच्या 15 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अमेरिकन फलंदाज नितीश कुमारने लेग साइडकडे चेंडू हवेत मारले, मोहम्मद सिराज डीप स्क्वोअर लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने काही पावले मागे सरकत हवेत उडी मारुन हा झेल पकडला. अप्रतिम झेल घेतल्यानंतर काही वेळ फलंदाजाला तो बाद झाला हेच समजले नाही. नितीश कुमार 23 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. या शानदार क्षेत्ररक्षणामुळे टीम मॅनेजमेंटनी युवराज सिंगद्वारे मोहम्मद सिराजला सामन्यातील ‘बेस्ट फील्डर’ चा पुरस्कार देण्यात आले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, कर्णधार रोहित शर्माचे निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने भेदक गोलंदाजी करत अमेरिकेचे कंबरडे मोडले. त्याने 4 षटकात केवळ 9 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, यजमान टीम फलंदाजीत संघर्ष करत 20 षटकात 111 धावांचे लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवले.
धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिल्याच षटकात साैरभ नेत्रावळकरने कोहलीला गोल्डन डकवर तंबूत पाठवले. विराट च्या विकेटनंतर टीम इंडिया सावरत असताना पुन्हा दुसऱ्या षटकात साैरभने कर्णधार रोहित शर्माला संथ चेंडूनी चकमा देत झेलबाद केले. अश्या स्थितीत सूर्यकूमार यादवने संघाला सावरत शिवम दुबे सोबत मॅच विनिंग भागीदारी केली. दोघांच्या 72 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना 1.4 षटके आधीच सामना संपवला आणि 7 विकेट्सनी शानदार विजय मिळवला.
महत्तवाच्या बातम्या-
‘दीवाली हो या होली, अनुष्का लव कोहली’ चाहत्यांने केली मजेशीर घोषणाबाजी, पाहा विराटची प्रतिक्रिया!
यशस्वी जयस्वालला प्लेइंग 11 मध्ये न आणता विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर कसं पाठवायचं? मोहम्मद कैफनं सुचवला पर्याय
आयसीसीचा ‘स्टॉप क्लॉक’ नियम काय आहे? ज्यामुळे भारताला 5 धावा फुकट मिळाल्या, जाणून घ्या